
इंदूर : एका विशेष सच्छिद्र सेंद्रिय पॉलिमरच्या साह्याने विकसित करण्यात आलेली ‘स्मार्ट ग्लास’ भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात ‘आयआयटी, इंदूर’च्या संशोधकांनी तयार केली आहे. या काचेमुळे उन्हाळ्यात इमारत थंड, तर थंडीमध्ये उबदार राहू शकते, असा दावा करण्यात आला आहे.