

IIT Madras White Paper: एआयमुळे भारतातील नव्या नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार; तरुणांच्या प्रशिक्षणावर परिणाम (प्रातिनिधिक फोटो)
esakal
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापरामुळे भारतातील नव्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. नियमित आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या कामांचे स्वयंचलन झाल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होऊ शकतो. मात्र, याचा अर्थ प्रत्येक क्षेत्रातील नोकऱ्या पूर्णपणे संपतील असा नाही. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रासच्या सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल एआय (CeRAI) या केंद्राने प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.