पॅन कार्ड Active आहे की Inactive? जाणून घेण्यासाठी फॉलो करा सोपी पद्धत

जर तुम्ही अजून पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर आजच लवकरात लवकर लिंक करा.
pancard
pancardesakal
Summary

जर तुम्ही अजून पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर आजच लवकरात लवकर लिंक करा.

पॅनकार्ड (Pan Card) हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे आर्थिक कागदपत्र आहे. आजकाल प्रॉपर्टी खरेदी करणं, बँक खातं उघडणं, गुंतवणूक (Investment) करणं, दागिने खरेदी करणं अशा जवळपास प्रत्येक आर्थिक गरजेमध्ये पॅनकार्डचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अजून पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर आजच लवकरात लवकर लिंक करा.

pancard
PAN Card बनवायचंय? या सोप्या स्टेप्ससह घरी बसूनच करा अप्लाय

1 एप्रिल 2022 पासून पॅन कार्डबाबतच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.आज आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही तर नंतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. यासोबतच पॅन कार्डही Inactive करण्यात येणार आहे.परंतु,अनेक वेळा पॅनला आधारशी लिंक केल्यानंतरही ते लिंक करता येत नाही आणि यामुळे पॅन कार्ड Inactive होईल.

अशा परिस्थितीत पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचे स्टेटस चेक करा. नाहीतर नंतर खूप त्रासाला सामोरं जावं लागेल. पॅन इनवॅलिड झाल्यास आपण बँकिंग सेवा घेऊ शकणार नाही. याशिवाय शेअर बाजारात ट्रेंडिंग करण्यावरही तुम्हाला बंदी घालण्यात येणार आहे. यासोबतच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आदींवरही बंदी घालण्यात येणार आहे. पॅन कार्डशिवाय तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही. हा त्रास टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला पॅन आणि आधार लिंक स्टेटस कसे तपासावे हे सांगणार आहोत-

pancard
Pan Card Update: लग्नानंतर लवकरात लवकर करा पॅन अपडेट अन्यथा...

पॅन कार्ड आणि आधार लिंक स्टेटस तपासा-

- पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्सच्या incometaxindiaefiling.gov.in वेबसाईटला भेट द्यावी.

- यानंतर Know Your Pan पर्यायावर क्लिक करा.

- यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, ज्यावर तुम्ही तुमचं नाव, नंबर, लिंग, जन्मतारीख, रजिस्टर्ड मोबाइल नंबर इत्यादी गोष्टी टाकू शकता.

- Submit करा.

- पुढे ते प्रविष्ट करा तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल.

- यानंतर तुमचा पॅन क्रमांक, नाव, वॉर्ड क्रमांक आणि एक रिमार्क लिहिला जाईल.

- तुमचे पॅन कार्ड अॅक्टिव्ह आहे की नाही हे या रिमार्कमध्ये तपासा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com