महत्त्वाचे! Google च्या दोन सेवा 15 दिवसांत होतायत बंद!

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मार्च 2019

गुगल या कंपनीने काही दिवसांपूर्वी त्यांचे Inbox हे ई-मेल अॅप बंद होणार असल्याचे जाहीर केले होते. आज (ता. 21) त्यांनी हे अॅप 2 एप्रिल बंद होणार असल्याचे घोषित केले आहे. हे अॅप वापरणाऱ्या युजर्सना Inbox कडून नोटीस पाठवण्यात आली आहे की, हे अॅप पुढील 15 दिवसात बंद केले जाईल. 

Inbox या अॅपसोबतच गुगलचे Google+ हे ही अॅप बंद होणार असल्याची माहिती आहे. Google+ देखील 2 एप्रिललाच बंद होईल. गुगलने सर्वात आधी घोषणा केल्याप्रमाणे या अॅप्सची सेवा मार्च अखेरपर्यंत बंद होणार होती. पण आता त्याची मुदत वाढवून ती सेवा 2 एप्रिलला बंद होईल. तसेच Inbox अॅपमधील काही फिचर्स जीमेलमध्ये आणणार असल्याचे गुगलने सांगितले आहे.

या सेवाही बंद करणार गुगल
Inbox व Google+ सह गुगल आपले Google Allo व युआरएल शॉर्ट करणारे टूल अॅपही बंद करणार आहे.     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inbox by Gmail Is Officially Shutting Down on April 2