सुरक्षित प्रवासासाठी भारतातील 8 कार पास तर एक नापास; Global NCAP रेटिंग जाहीर

global ncap
global ncap

नवी दिल्ली - देशात कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या स्वस्तात आणि जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या ग्राहकांना देत असताना सुरक्षेकडे कानाडोळा करत असल्याचं समोर आलं आहे. कंपन्यांच्या या चुकीचा फटका कारमधून प्रवास करताना अपघात झाल्यानंतर प्रवाशांना बसतो. कोणत्या गाड्या प्रवासासाठी किती सुरक्षित आहेत याबाबत ग्लोबल NCAP रेटिंगचे निकष लावले जातात. त्यानुसार गाड्यांना गुण दिले जातात. Global NCAP ने वयोवृद्ध आणि मुलांच्या दृष्टीने 64 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवून चाचणी घेतली. यामध्ये भारतातील तीन कार 5 स्टार रेटिंग मिळवू शकल्या तर 5 गाड्यांना 4 स्टार रेटिंग मिळालं. 

Mahindra XUV300- या कारने Global NCAP रेटिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. या कारला वृद्धांच्या दृष्टीने चाचणी घेतली असता 4 स्टार तर मुलांच्या दृष्टीने सुरक्षिततेच्या बाबतीत 5 स्टार मिळाले आहेत. सुरक्षा उपकरणांमध्ये फ्रंट सीट बेल्ट, ड्रायव्हर आणि पॅसेंजर फ्रंट एअरबॅग, एसबीआर, ISOFIX अँकरेज इत्यादीचा विचार केला जातो. Tata Altroz ने Global NCAP रेटिंगमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. या कारला 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. तर तिसऱ्या स्थानावर Tata Nexon असून या कारला 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. 

4 स्टार रेटिंग मिळालेल्या गाड्यांमध्ये Mahindra Marazzo, Volkswagen Polo, Tata Tiago आणि TATA Tigor, Maruti Suzuki Vitara Brezza या गाड्यांचा समावेश आहे. अडल्ट प्रोटेक्शन आणि चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनमध्ये या चारही गाड्यांना 4 स्टार रेटिंग मिळालं आहे.

मारुती सुझुकी S Presso या कारला ग्लोबल एनसीएपीने शून्य रेटिंग दिलं आहे. सुरक्षेचे निकष पूर्ण करत नसल्याचं सांगत शून्य रेटिंग दिल्याचं अहवालात म्हटलं आहे. याशिवाय Hyundai Grand I10 NIOS आणि Kia Seltos या कारनासुद्धा अनुक्रमे दोन आणि तीन रेटिंग देण्यात आलं आहे. 

कंपन्यांकडून कमी किंमतीत गाड्या बाजारात उतरवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकण्यासाठी अनेकदा सुरक्षेच्या बाबींमध्ये तडजोड केली जाते. गाड्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपलब्ध आणि आवश्यक उपकरणे कंपन्यांकडून पुरवली जात नाहीत. अशा परिस्थिती कारला अपघात झाल्यास प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यासाठीच दरवर्षी ग्लोबल NCAP कडून गाड्यांची चाचणी घेतली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com