
चंद्रयान-5 मोहिमेसाठी भारत आणि जपानने एकत्र येऊन अंतराळ संशोधनात नवे पाऊल टाकले आहे.
या मोहिमेत भारत लँडर तयार करेल आणि जपान जड रोव्हर विकसित करेल.
चंद्रयान-5 चंद्राच्या पर्यावरणाचा सखोल अभ्यास करेल आणि दोन्ही देशांच्या शांततापूर्ण उद्देशांसाठी अंतराळ संशोधनाला चालना देईल.
Chandrayaan-5 Mission : भारत आणि जपान यांनी अंतराळ संशोधनात एक नवे पाऊल टाकत चंद्रयान 5 मोहिमेसाठी हातमिळवणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियोत जपानच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीत ही घोषणा केली. ही भागीदारी दोन्ही देशांमधील मैत्री आणि वैज्ञानिक सहकार्याचे प्रतीक आहे. चंद्रयान 5 मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावरील संशोधनाला नवे परिमाण देणार असून, भारत आणि जपानच्या तंत्रज्ञानातील प्रगतीचे दर्शन घडवेल.(PM modi in Japan)