Speech To Speech AI Model: ‘आवाज’ कोणाचा....‘एआय मॉडेल’चा! जयपूरमधील ‘स्टार्टअप’ची किमया; भाषण आणि गायनही शक्य
India’s First Emotionally Intelligent Speech-to-Speech AI Model: जयपूरच्या तरुण स्पर्श अग्रवालने भावनिक बुद्धिमत्तेसह स्पीच-टू-स्पीच एआय मॉडेल तयार केले. हे भारतातील पहिले स्वदेशी एआय मॉडेल असून आवाज, भावना आणि संवाद एकत्र आणते.
जयपूर : जयपूरमधील २५ वर्षीय स्पर्श अग्रवाल याने आवाज बदलासंबंधीचे एक मुलभूत ‘एआय मॉडेल’ तयार केले आहे. या ‘मॉडेल’द्वारा गायन, भाषण, गप्पा आदी गोष्टी शक्य असून, ते भावनिक बुद्धिमत्तेसह प्रतिसाद देऊ शकते.