esakal | जगात इंटरनेट स्पीडमध्ये भारत खूपच स्लो; पाकिस्तान अन् नेपाळनेही टाकले मागे
sakal

बोलून बातमी शोधा

 internet speed

जगात इंटरनेट स्पीडमध्ये भारत पाकिस्तान अन् नेपाळच्याही मागे

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारत डिजिटल इंडियाच्या दिशीने वेगाने प्रगती करीत आहे. पण भारताचा मोबाइल इंटरनेट आणि ब्रॉडबँड स्पीड मात्र डिजिटल इंडियाच्या स्वप्नात अडथळा ठरत आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीचा विचार केला तर यावर्षी भारताची मोबाइल इंटरनेट आणि ब्रॉडबँड इंटरनेटची स्पीड काही प्रमाणात वाढली आहे. Ookla ग्लोबल इंडेक्सच्या अहवालानुसार मोबाइल इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत जूनमध्ये भारताला 137 देशांच्या यादीमध्ये 122 वे स्थान मिळाले आहे. तर या यादीमध्ये नेपाळ आणि पाकिस्तानसारखे देश देखील भारतापेक्षा खूपच पुढे असल्याचे समोर आले आहे. (India lags behind Pakistan and Nepal in internet speed in the world)

यावर्षी जून महिन्यात भारतातील मोबाइल डाऊनलोडिंगची सरासरी स्पीड 17.84 Mbps होती. याच काळात पाकिस्तानने 19.61 Mbps सह 114 व्या स्थानावर मिळवले तर 22.08 Mbps सह नेपाळ 105 व्या स्थानावर आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत नेपाळने 14 पॉंइट्सनी मानांकनात सुधारणा केली आहे.

टॉप मोबाइल डाउनलोडिंग स्पीड असलेले देश

  • संयुक्त अरब अमिराती - 193.51 Mbps

  • दक्षिण कोरिया - 180.48 Mbps

  • कतार - 171.76 Mbps

  • नॉर्वे - 167.60 Mbps

  • सायप्रस - 161.80 Mbps

हेही वाचा: झूम खरेदी करणार क्लाउड सॉफ्टवेअर प्रोव्हायडर Five9

फिक्स इंटरनेट स्पीडच्या बाबतील जून महिन्यात भारताला 181 देशांमध्ये 70 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. या कालावधीत डाऊनलोडिंगची सरासरी स्पीड ही 58.17 Mbps होती. जी मे महिन्यापेक्षा 55.65 Mbps जास्त आहे. फिक्स ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड रँकिंगच्या बाबतीत नेपाळ आणि पाकिस्तान भारतापेक्षा मागे आहेत. या यादीत पाकिस्तानला 164 वा क्रमांक मिळाला आहे. तर नेपाळ 115 व्या स्थानावर आहे.

टॉप 5 फिक्स्ड ब्रॉडबैंड स्पीड असलेले देश

  • मोनाको - 260.74 Mbps

  • सिंगापूर - 252.68 Mbps

  • हाँगकाँग - 248 Mbps

  • रोमानिया - 220.68 Mbps

  • डेन्मार्क - 217.18 Mbps

(India lags behind Pakistan and Nepal in internet speed in the world)

हेही वाचा: टेक्नो फोन्स, 20000 खालील मोबाईल फोन्स

loading image