esakal | झूम खरेदी करणार क्लाउड सॉफ्टवेअर प्रोव्हायडर Five9
sakal

बोलून बातमी शोधा

Zoom

झूम खरेदी करणार क्लाउड सॉफ्टवेअर प्रोव्हायडर Five9

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

ग्राहक गुंतवणूकीला चालना देण्यासाठी तसेच अधिक व्यावसायिक ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी Zoom Video Communications Inc कंपनीने क्लाउड सॉफ्टवेयर प्रोव्हायडर Five9 Inc सुमारे 14.7 अब्ज डॉलर्सच्या सर्व-स्टॉक करारादरम्यान खरेदी करणार आहे. कोरोनाव्हायरसने सर्व जगभरात थैमान घातल्याने सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा या teleconferencing services provider कंपनीकडे वळल्या होत्या. यामगील मुख्य कारण सध्या सर्व व्यवसाय आणि शाळा या फक्त व्हर्च्युअलीच सुरु आहेत. ऑफिस मिटींग्स आणि इतर बरीच कामांसाठी सध्या व्हर्च्युअली मिटींग घेतल्या जात आहेत आणि यासाठी त्यांची सेवा स्वीकारली जात आहे.

कंपनीने आता त्यांचे दोन वर्षांपुर्वीचे क्लाऊड-कॉलिंग प्रॉडक्ट झूम फोन आणि कॉन्फरन्स होस्टिंग प्रोडक्ट झूम रूम्सवर लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान फेसबुक आणि अल्फाबेटच्या गुगल एएमपीने देखील त्यांचे व्हिडिओ प्रोडक्ट्स वाढवले आहेत.

या खरेदीनंतर ग्राहकांमध्ये झूमची ग्राहकांमध्ये उपस्थिती वाढविण्यात मदत होईल आणि 24-अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ही दीर्घ मुदतीसाठी कंपनीच्या विकासाचा दर वाढविण्यास मदत करेल. तसेच हे अधिग्रहण झूम फोन सर्व्हिसेससाठू पूरक ठरेल तसेच Five9 चे व्यवसाय ग्राहक जोडून आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट सेंटर सॉफ्टवेअरच्या मदतीने ग्राहकांशी संवाद वाढवला जाईल. असे कंपनीच्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

झुमचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोवन ट्रॅलोप हे या कंपनीचे अध्यक्ष असतील आणि Five9 हे झूमचे ऑपरेटिंग युनिट असेल आणि या करारानंतर रोवन ट्रॅलोप युनिटचे प्रमुख म्हणून राहतील, हा करार 2022 च्या उत्तरार्धात पुर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: संगणक, लॅपटॉपच्या मागणीत वाढ; किमतीही वधारल्या

या करारानुसार, दोन्ही कंपन्यांच्या मंडळांनी मंजूर केल्यानुसार Five9 स्टॉकधारकांना Five9 च्या प्रत्येक शेअरसाठी झूमच्या शेअरमधील कॉमन स्टॉक ए क्लासमधील 0.5533 समभाग मिळेल. झूम क्लास ए कॉमन स्टॉकच्या 16 जुलैच्या Closing शेअर किंमतीच्या आधारे, Five9 कॉमन स्टॉकच्या प्रत्येक समभागासाठी 200.28 डॉलर्सची किंमत आणि implied deal value सुमारे 14.7 अब्ज डॉलर्स आहे.

हेही वाचा: Clubhouse चे मेसेजिंगसाठी 'Backchannel' हे भन्नाट फिचर लाँच

loading image