

India MeitY new AI regulations 2026
AI Generated image
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून २० फेब्रुवारीपासून नवे AI नियम लागू होणार आहेत. हे नियम प्रामुख्याने डीपफेक आणि दिशाभूल करणाऱ्या एआय कंटेटवर लगाम लावण्यासाठी बनवण्यात आले आहेत. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणताही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवलेला व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करताना तो AI जनरेटेड असल्याचे स्पष्टपणे नमूद करणे अनिवार्य असेल. PIB India च्या माध्यमातून सरकार या नियमांच्या अंमलबजावणीवर कडक लक्ष ठेवणार आहे.