झूम : दमदार मायलेजसाठी ‘रेडॉन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडॉन

झूम : दमदार मायलेजसाठी ‘रेडॉन’

भारतात सर्वसामान्य ग्राहकांना किंमत, खिशाला परवडणाऱ्या, नजरेत भरणाऱ्या उठावदार दुचाकी बाजारात आणण्याचे मोठे आव्हान कंपन्यांसमोर असते. टीव्हीएसनेही सुरुवातीला ११० सीसी श्रेणीत स्टार सिटी, स्पोर्ट्स या दुचाकी बाजारात आणल्या. टीव्हीएसने २०१८मध्ये रेडॉन ही दुचाकी भारतात दाखल केली. या दुचाकीला मिळालेला प्रतिसाद पाहून काही महिन्यांपूर्वी रेडॉन ‘ड्युअल टोन’ रंगप्रकारात कंपनीने बाजारात आणली. या गाडीची राईड केल्यानंतर ११० सीसी श्रेणीत रेडॉन ‘लंबी रेस का घोडा’ ठरू शकते, एवढे नक्कीच म्हणता येईल.

अधिक मायलेज, थोडीशी स्टायलीश आणि आरामदायी दुचाकींना ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळतो. टीव्हीएसची रेडॉनही याच अनुषंगाने अर्धशहरी आणि ग्रामीण भागातील दुचाकीप्रेमींची गरज लक्षात घेऊन बाजारात आणली आहे. २०१८मध्ये आलेल्या या दुचाकीत कंपनीने अनेक बदल केले. नुकताच ११० सीसी श्रेणीत पहिल्यांदाच टीव्हीएसने रेडॉन ‘ड्युअल टोन’ पर्यायात आणली.

लाल/निळा+काळा अशा दुहेरी रंगात ही दुचाकी आता पूर्वीप्रमाणेच अधिक आकर्षक दिसू लागली आहे. रेडॉनचे तसे तीन व्हेरिएंट, त्यातील ड्युअल टोनमध्ये डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक असे दोन प्रकार. यातील ड्युअल टोन ड्रम प्रकाराची एक्स शेरूम किंमत ७१ हजार, तर डिस्क ब्रेक प्रकाराची किंमत ७४ हजार आहे. बाजारात दाखल झाल्यापासून आतापर्यंत चार लाखाहून अधिक रेडॉन विक्री झाल्या आहेत. रेडॉनची सर्व प्रकारच्या रस्त्यांवर राईडचा अनुभव चांगला होता.

रेडॉन का घ्यावी?

१) दमदार इंजिन : रेडॉनमध्ये १०९.७ सीसी क्षमतेचे ४ स्ट्रोक ड्युरालाईफ इंजिन दिले असून, जे ८.०८ बीएच पॉवर, ८.७ एनएम टॉर्क निर्माण करते. एकूणच इंजिनचे स्पेसिफिकेशन साधारण वाटत असले, तरी तिची रस्त्यावरील कामगिरी दमदार ठरते. तत्काळ स्पीड घेत असल्याने ओव्हरटेकिंगला जास्त कष्ट पडत नाहीत.

२) अधिक मायलेज : रेडॉनमध्ये इको थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन सिस्टिम देण्यात आली असून, त्यामुळे १५ टक्के अधिक मायलेज मिळतो, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला. १० लिटरचा इंधन टाकी, त्यात ७० किमी प्रतिलिटर मायलेजचा दावा टीव्हीएसने केला आहे. रेडॉनची राईड करत पूर्ण वेगात चालवल्यानंतरही ही गाडी ६५ ते ७०च्या आसपास मायलेज नक्कीच देते.

३) आरामदायी प्रवास : ८०० मिलिमीटर उंच, लांब आणि समान आसन-व्यवस्थेमुळे रेडॉनवरील प्रवास आरामदायी होतो. सॉलिड सस्पेन्शन्समुळे धक्केही बसत नाहीत. १८ इंची चाकांमुळे रस्त्यावर अतिवेगातही स्थिर राहता येते. या गाडीची रस्त्यावरील पकडही चांगली आहे.

४) सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी : हल्ली स्कूटरमध्ये कॉम्बो ब्रेकिंग सिस्टिम देण्यात येते. रेडॉनमध्ये यासारखीच आधुनिक सिंक्रोनाईज्ड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी दिली असून, ज्यामुळे दुचाकी तत्काळ नियंत्रित होते. पाठीमागील ब्रेक दाबल्यानंतर पुढील ब्रेकही त्याचवेळी लागतो.

५) आकर्षक स्टाइल : कमीत कमी ग्राफिक्समध्येही ही गाडी अधिक उठावदार दिसते. सुरक्षित प्रवासासाठी एलईडी डीआरएल, कारप्रमाणेच सर्व वैशिष्ट्यांनी युक्त स्पीडोमीटर, हेडलाईटवरील क्रोम इफेक्ट, गोल आणि क्रोम इफेक्टसह आरसे, इंधन टाकीवर थाय पॅड डिझाईन, स्क्रॅचेसपासून सुरक्षितता म्हणून युनिक इम्पॅक्ट रेझिस्टन्स डिझाईन रेडॉनच्या सौंदर्यात भर घालते.

Web Title: India Radeon Bike Marathi Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :science
go to top