भारत न्यू एनर्जीच्या जोरावर महासत्ता बनेल - मुकेश अंबानी

relinace mukesh ambani
relinace mukesh ambaniesakal

नाशिक : 20 ते 30 भारतीय ऊर्जा कंपन्यांमध्ये रिलायन्सइतकी (Reliance) मोठी होण्याची क्षमता आहे. त्यामुळे येत्या दोन दशकांत भारत न्यू एनर्जीच्या (New Energy) जोरावर जागतिक शक्तीचा दर्जा प्राप्त करेल असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केले आहे. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 'एशियन इकॉनॉमिक डायलॉग 2022' ला संबोधीत केले. त्यावेळी ते बोलत होते.

देशात रोजगाराच्या संधी वाढणार

पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर यांच्याशी झालेल्या संभाषणात मुकेश अंबानी म्हणाले, नवीन उर्जेमध्ये पुन्हा एकदा जग निश्चित करण्याची शक्ती आहे. उदाहरणार्थ, लाकडाचे कोळशात रूपांतर झाले तेव्हा युरोपने भारत आणि चीनला मागे टाकले होते. त्याचप्रमाणे अमेरिका आणि पश्चिम आशियातील देश तेलाच्या बाबतीत खूप पुढे गेले. आता भारताची वेळ आली आहे, जेव्हा भारत हरित आणि स्वच्छ ऊर्जेत स्वयंपूर्ण होईल आणि निर्यात करेल, तेव्हा भारताला जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. हरित ऊर्जेमुळे भारत केवळ जागतिक महासत्ता बनणार नाही तर भारतात रोजगार निर्मिती देखील होईल तसेच परकीय चलनही वाचेल असे त्यांनी सांगितले.

relinace mukesh ambani
E-PAN कार्ड महत्वाचे का आहे? घरबसल्या कसे करू शकता डाउनलोड, वाचा

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा दिला संदर्भ

पंतप्रधान मोदी हे नवीन आणि स्वच्छ ऊर्जेचे मोठे समर्थक आहेत. सरकारने नवीन ऊर्जेसाठी आपले दरवाजे उघडल्यामुळे भारत हरित ऊर्जा निर्यात करेल यात मला शंका नाही. त्या समर्थनार्थ धोरणे आणली आहेत. ज्याप्रमाणे भारत आयटी क्षेत्रातील महासत्ता आहे, त्याचप्रमाणे भारत अक्षय ऊर्जा क्षेत्रातही जागतिक आघाडीवर बनेल. पुढील 20 वर्षांत भारतातून स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्यात अर्धा ट्रिलियन डॉलर्सची होण्याची अपेक्षा आहे. नवीन ऊर्जेतील गुंतवणुकीसाठी भारत हा जगातील सर्वाधिक पसंतीचा देश आहे असेही मुकेश अंबानी यांनी नमूद केले.

relinace mukesh ambani
Sim Card वापरुन रिकामे होऊ शकते बँक खाते, या गोष्टी ठेवा लक्षात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com