Pakistan Hackers : पाकिस्तानी हॅकर्सच्या निशाण्यावर भारतातील अँड्रॉईड फोन; त्वरीत अनइन्स्टॉल करा 'हे' अ‍ॅप

Indian Android Users : भारतीयांच्या फोनमध्ये शिरून हेरगिरी करण्यासाठी ट्रान्सपॅरेंट ट्राईब हा पाकिस्तानी ग्रुप CapraRAT या मालवेअरची मदत घेत आहे.
Pakistan Hackers
Pakistan HackerseSakal

पाकिस्तानमधील हॅकर्स हे सध्या भारतातील अँड्रॉईड यूजर्सवर सायबर हल्ला करत असल्याचं समोर आलं आहे. भारतात लोकप्रिय असलेल्या अ‍ॅप्ससारखेच दिसणारे काही फेक अ‍ॅप्स हे हॅकर्स तयार करत आहेत. या माध्यमातून अँड्रॉईड फोनमध्ये व्हायरल इन्स्टॉल करण्यात येत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

भारतीयांच्या फोनमध्ये शिरून हेरगिरी करण्यासाठी ट्रान्सपॅरेंट ट्राईब हा पाकिस्तानी ग्रुप CapraRAT या मालवेअरची मदत घेत आहे. हा एक रिमोट अ‍ॅक्सेस ट्रोजन व्हायरस आहे, जो स्मार्टफोनमधील डेटा चोरून हॅकर्सपर्यंत पोहोचवू शकतो.

Pakistan Hackers
Mobile Hacking : OTT अ‍ॅप्स डाऊनलोड करताना खबरदारी गरजेची; नवीन मालवेअर करतोय अँड्रॉईड मोबाईलवर हल्ला! सरकारचा इशारा

कोणत्या अ‍ॅपची कॉपी?

मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी यूट्यूब या लोकप्रिय अ‍ॅपची कॉपी केली आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. मात्र, इतर लिंक, मेसेज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हॅकर्स भारतीय यूजर्सना हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास सांगत आहेत. यासाठी विविध प्रकारची प्रलोभने देखील देण्यात येत आहेत.

कोणाला करतायत टार्गेट?

पाकिस्तानातील हॅकर्स हे प्रामुख्याने काश्मीर भागातील लोक आणि मानवाधिकार संघटनांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना टार्गेट करत आहेत. या व्यक्तींच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरण्यासाठी याचा वापर केला जातो आहे.

Pakistan Hackers
Mobile Hacked Sign : तुमचा फोन Hack झालाय कसं ओळखाल?

अशी घ्या खबरदारी

सायबर हल्ल्याला आपला फोन बळी पडू नये, यासाठी ठराविक खबरदारी घेणं गरजेचं आहे. नवीन अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले-स्टोअरचाच वापर करावा. तसंच, कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असं आवाहन सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com