भारतीयांचे मूळ आफ्रिका, इराणमध्ये 

पीटीआय
शुक्रवार, 12 मे 2017

लंडन : गेल्या पन्नास हजार वर्षांमध्ये आफ्रिका, इराण आणि मध्य आशियातून विविध तीन टप्प्यांमध्ये आलेल्या स्थलांतरितांच्या लाटा हे भारतीय लोकसंख्येचा स्रोत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. भारतीय उपखंडामधील विविध व्यक्तींच्या जनुकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

भारतीय उपखंडामध्ये विशेषत: भारतामध्ये प्रचंड विविधता आहे. येथे अनेक भाषा, संस्कृती आणि धर्म हजारो वर्षांपासून एकत्र नांदत आहेत. याबाबत ब्रिटनमधील हडर्सफिल्ड विद्यापीठातील तज्ज्ञांनी अभ्यास केला. त्यांच्या निष्कर्षानुसार, दक्षिण आशियातील काही जनुकांचा इतिहास फार प्राचीन आहे. भारतात साधारणपणे पन्नास हजार वर्षांपूर्वी आलेले लोक हे मूळ आफ्रिकेतील भटके शिकारी होते. त्यानंतर साधारण वीस हजार वर्षांपूर्वी आलेल्या हिमयुगानंतर इराणमधून स्थलांतरितांची लाट भारतात आली. याच लोकांनी भारतात शेतीचा प्रसार केला. जनुकांमधील स्त्रीनिर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या गुणसूत्रांचा (वाय) अभ्यास केला असता त्यामध्ये हे वैशिष्ट्य दिसून येते. मागील पाच हजार वर्षांमध्ये भारतात स्थलांतरितांची तिसरी लाट मध्य आशियातून आली, असे संशोधक गटाच्या सहप्रमुख मरिना सिल्वा यांनी सांगितले. 

संस्कृत-ग्रीक संबंध 
ताम्र युगात कॉकेशस प्रांतातून प्रथमच काही लोक स्थलांतरित होऊन भारतात आले. पुरुषसत्ताक संस्कृती असलेल्या या भटक्‍या लोकांनी घोड्याला माणसाळले होते आणि त्यांच्याच भाषेत नंतर थोडा बदल होऊन संस्कृतची निर्मिती झाली. संस्कृतचे प्राचीन ग्रीक आणि लॅटिन भाषेशी अनेक प्रकारे साम्य असल्याचेही दिसून आल्याचे सिल्वा यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian population originated in three migration waves: study