भारतीय यूजर्ससाठी 'फूड डिलिव्हरी' 

indian users food delivery app
indian users food delivery app

भारतीय खाद्यसंस्कृृती जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक देशांमध्ये खास भारतीय पदार्थ मिळणारी हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स विशेष पसंतीची ठरली आहेत. तशी प्रत्येक शहराची खाद्यपदार्थांच्या बाबतीत वेगळी ओळख आहे. भारतीयांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीची दखल गुगलने घेतली आहे. गुगलने भारतीय यूजर्सकरिता खास खाद्यपदार्थांविषयीचे ऍप आणले आहे. "एरिओ' (Areo) नावाचे हे "फूड डिलिव्हरी' ऍप आहे. याच्या माध्यमातून खाद्यपदार्थांबरोबरच अन्य सेवाही आर्डर करता येतात. मात्र, त्याबरोबरच घरगुती किरकोळ दुरुस्तीसाठी टेक्‍निशियन्सनाही ऍपमध्ये स्थान देण्यात आले आहे. 

स्थानिक रेस्टॉरंटमधून पार्सल ऑर्डर करण्याबरोबरच कामासाठी इलक्‍ट्रिशियन, प्लंबर आणि पेंटर्सनाही या ऍपद्वारे बोलावता येईल. त्यासाठी ऍपवर "टाइम स्लॉट' हा ऑप्शन असून, त्यात टेक्‍निशियन ठरविण्याबरोबरच त्यांना बोलाविण्यासाठी यावर वेळ निश्‍चित करता येते. सध्या हे ऍप मुंबई तसेच बंगळूरमधील यूजर्ससाठीच खुले आहे. हळूहळू ते अन्य शहरांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. याचे "इंटरऍक्‍टिव्ह यूजर इंटरफेस' हे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. 

गुगलने अशाप्रकारचे हे पहिलेच ऍप आणले आहे. मात्र, अन्य ऍप्सप्रमाणे याचे प्रमोशन करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे ऍप सध्या केवळ टेस्टिंगसाठी जारी केल्याचे बोलले जात आहे. ऍपमधील काही ऑप्शनवरूनतरी हेच जाणवते. गुगलचे "ऍन्ड्रोईड वन' हे व्हर्जन सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे कंपनी सावधपणे पाऊल टाकत आहे. "एरिओ' ऍप यूजर्सच्या पसंतीस उतरले व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर त्याचे देशभर व नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रमोशन करण्याचा विचार गुगल करू शकते. मुंबई तसेच बंगळूरमधील यूजर्सचा या ऍपला कसा प्रतिसाद मिळतोय, त्यावरच एरिओचे भविष्य ठरणार, हे मात्र निश्‍चित! 

क्लिक करा : https://goo.gl/LC8Ijv

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com