स्मार्टफोनवर यूटयूब व गेम्स खेळण्यात महिला आघाडीवर

पीटीआय
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : स्मार्टफोनवर असलेल्या असंख्य ऍप्स आणि गेम्स खेळण्यात यूटयूबच्या वापरात भारतीय महिला आघाडीवर असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

पुरूषांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक व्यक्ती सरासरी रोज तीन तास सेलफोन वापरते असेही निष्कर्षात म्हणले आहे. महिला पुरूषांच्या तुलनेत फेसबुकवर किमान ऐंशी टक्के जास्त वेळ घालवतात.

मोबाईल मार्केटिंग असोसिएशन व कॅंटर आयएमआरबी या संस्थांनी या सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित केला आहे. भारतातील मोबाईल स्मार्टफोन व फीचर फोन युजर्सचे स्वरूप व त्यांच्या सवयी या निकष ठरवले. हे प्रमाण 2015 पेक्षा 55 टक्के वाढले आहे. या निष्कर्षांवरून लोक टीव्ही आणि इतर माध्यमांपेक्षा मोबाईलचा वापर जास्त करत असल्याचे दिसून आले. स्मार्टफोनवर खर्च केलेल्या वेळापैकी पन्नास टक्के वेळ हा सोशल मीडिया व मेसेजिंग ऍप्सवर खर्च केला जातो.

मोबाईल मार्केटिंग असोसिएशनचे डी. शिवकुमार म्हणाले,""महिला स्मार्टफोनवर पुरूषांपेक्षा दुप्पट वेळ यूटयूब व गेम्सवर घालवतात. या निष्कर्षांमधून आणखी एक समोर आलेली बाब म्हणजे मनोरंजनापेक्षा ऑनलाईन शॉपिंगचा वापर पंधरा टक्के जास्त आहे. लोकप्रियतेत ऑनलाईन खरेदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात मोबाईलची 85 टक्के लोकांकडे असून मोबाईलची मोठी बाजारपेठ आता विस्तारत आहे.''

""दूरसंचार क्षेत्रात फोरजी सुविधेनंतर माहिती डेटाची किंमत कमी होईल. एसएमएस व फ्री व्हॉइस सेवेत बदल होतील,''असे मीडिया अँड रिटेलचे उपाध्यक्ष हेमंत मेहता यांनी सांगितले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian women spend more time on smartphones than men: report