अवकाशातील 'त्या' ताऱ्याला नाव सुचवायचंय? ही घ्या संधी!

सम्राट कदम
Monday, 15 July 2019

'एचडी 86081' ताऱ्याची वैशिष्ट्ये 
- "एचडी 86081' हा तारा आपल्या सूर्यापेक्षा जास्त गरम, आकाराने आणि वयाने मोठा आहे 
- याच्याच शेजारी असलेला ग्रह "एचडी 86081 बी' हा वस्तुमानाने आणि आकाराने गुरू ग्रहासारखा. 
- रात्रीच्या वेळेस भारतीय उपखंडातून अवकाशात हा तारा दिसतो 

पुणे : आतापर्यंत तुम्ही लहान मुलांचे नामकरण केले असेल; पण आता चक्क एका सूर्याचे आणि त्याच्या उपग्रहाचे नामकरण करण्याची नामी संधी चालून आली आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने (आयएयू) पृथ्वीपासून 340 प्रकाशवर्षे दूर असलेला तारा 'एचडी 86081' आणि त्याचा ग्रह 'एचडी 86081 बी'ला नाव देण्याची जबाबदारी भारतीयांवर सोपवली आहे. 

या नावांची निवड करण्यासाठी 'नेम एक्‍सो वर्ल्ड इंडिया' स्पर्धेचे "आयएयू इंडिया'तर्फे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी तरुणांचे दोन वयोगट करण्यात आले आहेत. त्यामध्ये 10 ते 18 वयोगटातील मुलांचा गट त्या सूर्यमालेतील 'ग्रहाला' आणि 18 ते 22 वयोगटातील तरुणांचा गट 'ताऱ्याला' नाव सुचवू शकतात. सुचवलेले नाव इंग्रजीसह कोणत्याही भारतीय भाषेतील असावे; तसेच स्पर्धकाने त्या नावाचे योग्य स्पष्टीकरण 100 शब्दांत अर्जासोबतच देणे आवश्‍यक आहे.

देशभरातून सुचविलेल्या नावांमधून दहा नावांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. या नावांसाठी देशभरातून मतदान घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी स्वतः सुचविलेले नाव http://bit.ly/newIndia या संकेतस्थळावर 15 ऑगस्टच्या आत पाठवावे. 

'एचडी 86081' ताऱ्याची वैशिष्ट्ये 
- "एचडी 86081' हा तारा आपल्या सूर्यापेक्षा जास्त गरम, आकाराने आणि वयाने मोठा आहे 
- याच्याच शेजारी असलेला ग्रह "एचडी 86081 बी' हा वस्तुमानाने आणि आकाराने गुरू ग्रहासारखा. 
- रात्रीच्या वेळेस भारतीय उपखंडातून अवकाशात हा तारा दिसतो 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indians can give name that 'star'