
नवी दिल्ली : भारत २०२७ मध्ये ‘चांद्रयान ४’ ही मोहीम राबविणार असून चंद्रावरील खडकांचे नमुने या मोहिमेतंर्गत पृथ्वीवर आणले जातील, अशी माहिती विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्रसिंह यांनी दिली. त्याचप्रमाणे, ‘चांद्रयान ४’ मोहिमेत अवजड ‘एलव्हीएम-३’ प्रक्षेपकाचे किमान दोनवेळा स्वतंत्ररीत्या प्रक्षेपण केले जाईल. या प्रक्षेपकातून पाच वेगवेगळे घटक अवकाशात नेले जातील आणि ते कक्षेत एकत्रित जोडले जातील, असेही त्यांनी सांगितले.