

Infinix ने भारतीय बाजारात दोन नवीन लॅपटॉप लॉन्च केले आहेत ज्यात InBook X1 आणि InBook X1 Pro यांचा समावेश आहे. Infinix ने भारतीय बाजारपेठेत आपले लॅपटॉप लॉन्च करण्याची ही पहिलीच वेळ असून या दोन्ही पैकी Infinix InBook X1 हा Intel Core i3 आणि Core i5 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे, तर InBook X1 Pro याच प्रोसेसरसह Intel Core i7 लाँच करण्यात आला आहे . या दोन्ही लॅपटॉप्सवप तुम्हाला Windows 11 उपलब्ध असेल.
Infinix InBook X1 चे स्पेसिफिकेशन्स
Infinix InBook X1 हा लॅपटॉप Windows 11 Home सह देण्यात आला आहे. यात 300 nits च्या ब्राइटनेससह 14-इंचाचा फुल HD IPS डिस्प्ले देखील आहे. LPDDR4X RAM आणि M.2 SSD स्टोरेजसह Intel Core i3-1005G1 आणि Core i5-1035G1 सह लॅपटॉप खरेदी केला जाऊ शकतो.InBook X1 मध्ये इंटेल UHD ग्राफिक्स कार्ड मिळेल, तसेच लॅपटॉपसोबत एचडी वेबकॅम देण्यात आला आहे.
या लॅपटॉपमध्ये 1.5W स्टिरीओ स्पीकर्ससह दोन 0.8W ट्वीटर डीटीएस ऑडिओ साऊंड स्पीकरचा सपोर्टसह दोन मायक्रोफोन्ससह देखील आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, लॅपटॉपमध्ये एक USB 2.0, दोन USB 3.0, दोन USB Type-C पोर्ट, एक HDMI 1.4 आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. यात Wi-Fi 802.11ac आणि Bluetooth v5.1 देखील आहे. Infinix InBook X1 मध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 55Wh बॅटरी सोबत मिळेल.
Infinix InBook X1 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Infinix InBook X1 Pro मध्ये Windows 11 Home उपलब्ध असेल. यात 300 nits ब्राइटनेससह 14-इंचाचा फुल HD IPS डिस्प्ले दिला असून यामध्ये Intel Core i7-1065G7 प्रोसेसर, 16GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 512GB पर्यंत M.2 SSD स्टोरेज आहे. यात इंटेल आयरिस प्लस ग्राफिक्स यासोबतच एचडी वेबकॅमही मिळणार आहे.
या लॅपटॉपमध्ये 1.5W स्टीरिओ स्पीकरसह दोन 0.8W ट्वीटर्स दिले आहेत. डीटीएस ऑडिओ साऊंड स्पीकर सपोर्ट आणि दोन मायक्रोफोन्स देखील मिळतात. कनेक्टिव्हिटीसाठी, लॅपटॉपमध्ये एक USB 2.0, दोन USB 3.0, दोन USB Type-C पोर्ट, एक HDMI 1.4 आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. यात Wi-Fi 802.11ac आणि Bluetooth v5.1 देखील आहे. Infinix InBook X1 मध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 55Wh बॅटरी मिळते.
Infinix InBook X1, InBook X1 Pro ची किंमत
Infinix InBook X1 Core i3, 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 35,999 रुपये आहे. त्याच वेळी, Core i5 आणि 8 GB सह 512 GB SSD स्टोरेज मॉडेलची किंमत 45,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Infinix InBook X1 Pro ची किंमत 55,999 रुपये आहे जी 16 GB रॅम आणि 512 GB SSD स्टोरेजसाठी आहे. Infinix InBook X1 सीरीजमधील लॅपटॉपची विक्री 15 डिसेंबरपासून Flipkart वरून होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.