esakal | खिशाला परवडणारा फोन Infinix Note 11 Pro लॉन्च, पाहा डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

Infinix Note 11 Pro

खिशाला परवडणारा फोन Infinix Note 11 Pro लॉन्च, पाहा डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Infinix ने आपल्या नोट सीरीजचा नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Infinix Note 11 Pro हा कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन असून या डिव्हाइस मुख्या फीचर म्हणजे यात देण्यात आलेली मोठी बॅटरी डिस्प्ले आहे. नोट 11 प्रो मध्ये 6.95-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे Infinix Note 11 Pro चे फीचर्स, किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घेऊयात.

Infinix Note 11 Pro : किंमत आणि फीचर्स

Infinix कंपनीने Note 11 Pro लाँच केला असून हा फोन लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. यात 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली असून यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे फोन 33W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

या डिव्हाइसमध्ये MediaTek Helio G96 चिपसेट दिला असून हाच चिपसेट Realme 8i मध्येही अपल्याला पाहायला मिळतो. Infinix स्मार्टफोन LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज सह येतो. कंपनीने अद्याप रॅम आणि स्टोरेज व्हेरियंटची घोषणा केलेली नाही. तरी फोन किमान 4GB/6GB RAM सह फोन लाँच होण्याची अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा: MG Astor भारतात लाँच, किंमत Hyundai Creta पेक्षा कमी

या फोनमध्ये 6.95-इंच फुल HD + IPS LCD दिला असून स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसाठी सपोर्टसह येते. फ्रंट कॅमेरासाठी वर मध्यभागी एक लहान पंच-होल कटआउट दिले आहे, परिणामी स्क्रीन-टू-बॉडी रेशो 91 टक्के आहे.

डिव्हाइसच्या मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा सेटअप दिला आहे यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला असून कॅमेरा मॉड्यूलमध्ये 13 एमपी सेंकडरी कॅमेरा आणि 2 एमपी तिसरा सेन्सर देखील दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 एमपीचा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळेल. फोन ड्युअल स्पीकर्ससह येतो आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक फीचर देखील मिळते.

इतर फीचर्समध्ये साइड -माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक आणि तीन कलर ऑप्शन्स - ब्लू, ग्रे आणि ग्रीन यांचा समावेश आहे. फोनची किंमत $ 249 म्हणजे सुमारे 18,700 रुपये आहे.

हेही वाचा: आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

loading image
go to top