esakal | भारतासह जगभरात इन्स्टाग्राम डाउन; वापरकर्त्यांची सोशल मिडियावर तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

 Instagram

भारतासह जगभरात इन्स्टाग्राम डाउन; वापरकर्त्यांची सोशल मिडियावर तक्रार

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म Instagram हे भारतासह जगातील अनेक भागात डाऊन झाले आहे. इन्स्टाग्राम हे आपले सर्व्हर त्यांच्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि फेसबुकवर(Facebook) शेअर करते, परंतु या दोन अॅप्समध्ये कोणतीही समस्या नाही, हे अॅप इंस्टाग्रामच्या अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर काम करत नाहीये. अनेक वापरकर्त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर तक्रार केली आहे.

45 टक्के वापरकर्त्यांनी केलीय तक्रार

डाऊन डिटेक्टर वेबसाइटनुसार, भारतात आज सकाळी 11 वाजता इन्स्टाग्राम वापरत असताना वापरकर्त्यांना अडचण येऊ लागली. सुमारे 45 टक्के इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी अॅपबद्दल तक्रार केली आहे तर 33 टक्के वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम वेबसाइटवर अडचणी येत आहेत. आतापर्यंत 1,000 पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी वेबसाइटवर या समस्येबद्दल तक्रार केली आहे.

इतकेच नाही तर इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी याबद्दल ट्विट करणे सुरू केले आहे. हि समस्या फक्त आफलालाच आहे की इतरही अनेक जणांना हीच अडचण येतेय हे तपासण्यासाठी लोक ट्विटरवर तक्रार करत आहेत. याआधी देखील इंस्टाग्राम डाऊन झाले होते. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि वॉशिंग्टन डीसी मधून मोठ्या प्रमाणावर आऊटेज झाल्याचे समोर आले होते. डाऊडिटेक्टरच्या मते , न्यूज फीडमध्ये सर्वाधिक समस्या नोंदवल्या गेल्या त्यांनंतर स्टोरी आणि इन्स्टाग्राम वेबसाइट यांचा क्रमांक लागतो.

हेही वाचा: दसरा-दिवाळीसाठी आताच करा कारची बुकींग, अन्यथा ५ महिने पाहावी लागेल वाट

loading image
go to top