
इंस्टाग्रामचे ‘पिक्स’ फीचर वापरकर्त्यांना आवडींवर आधारित मित्रांशी जोडते.
लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी आता किमान १००० फॉलोअर्स आवश्यक आहेत.
इंस्टाग्राम मॅप आणि इतर नवीन फीचर्समुळे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारेल.
Instagram Picks Feature : सोशल मीडियातील लोकप्रिय अॅप इंस्टाग्रामने वापरकर्त्यांना एकमेकांशी अधिक जवळ आणण्यासाठी नवीन फीचर ‘पिक्स’ फीचर आणण्याची तयारी सुरू केली आहे. काही रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या अंतर्गत चाचणीच्या टप्प्यात आहे आणि लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या फीचरद्वारे वापरकर्त्यांना आपले आवडते चित्रपट, पुस्तके, टीव्ही शो, गेम्स आणि संगीत निवडता येणार आहे. इंस्टाग्राम या निवडींच्या आधारे तुमच्या मित्रांशी समान आवडी शोधून तुम्हाला त्यांच्याशी जोडेल.