
Instagram Map Feature Live Location Sharing Feature
esakal
Instagram Live Location Sharing Feature : इंस्टाग्रामने भारतीय वापरकर्त्यांसाठी एक नवे आणि रोमांचक मॅप फीचर आणले आहे, जे तुम्हाला तुमचे रिअल टाइम लोकेशन मित्रांसोबत शेअर करण्याची सुविधा देते. हे फीचर ऑगस्टमध्ये जागतिक स्तरावर लॉन्च झाले होते आणि आता ते भारतात उपलब्ध आहे. यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांसोबत किंवा ग्रुपसोबत तुम्ही सध्या कुठे आहात हे शेअर करू शकता. इतकेच नाही तर हे फीचर तुम्हाला जवळपासच्या पार्ट्या, कार्यक्रम आणि ट्रेंडिंग ठिकाणांची माहितीही देईल.