

How to Use Instagram's New Built-In Teleprompter Feature | Step-By-Step Guide
sakal
Step-by-Step Guide on How to Use Instagram's Teleprompter Feature: सध्या दिमाखात आणि मोठ्या प्रमाणात चालत असलेली इंडस्ट्री म्हणजे कंटेट इंडस्ट्री. रोज लाखो कंटेट क्रिएटर्स वेगवेगळ्या पद्धतीचा कंटेट बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. यासाठी जास्तीत जास्त वेळेस स्क्रिप्ट तयार करून तशीचा तशी बोलावी लागते.
पण बऱ्याचदा कॅमेऱ्यासमोर उभं राहिल्यावर डायलॉग विसरणं, वारंवार कट घेणं आणि छोट्याशा चुकीसाठी पुन्हा रील शूट करणं… प्रत्येक कंटेंट क्रिएटरची ही मोठी डोकेदुखी असते. पण आता इंस्टाग्रामने यावर भन्नाट उपाय आणला आहे. नवीन टेलिप्रोम्प्टर फीचरमुळे स्क्रिप्ट थेट स्क्रीनवर दिसणार असल्याने रील्स शूट करणं अजूनच सोपं आणि प्रोफेशनल होणार आहे. त्यामुळे आता कमी वेळात झटपट आणि बिना कटचे व्हिडीओ तयार करता येणार आहेत.