esakal | Instagram मध्ये मोठा बदल; 'या' वापरकर्त्यांचे अकाउंट होणार प्रायव्हेट
sakal

बोलून बातमी शोधा

 Instagram

Instagram मध्ये मोठा बदल; 'या' वापरकर्त्यांचे अकाउंट होणार प्रायव्हेट

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

इन्स्टाग्रामने काही मोठे बदल जाहीर केले आहेत. हे बदल इंस्टाग्रामवर 16 वर्षाखालील वापरकर्त्यांसाठी केले जात आहेत. इंस्टाग्राम आता 16 वर्षाखालील सर्व नवीन वापरकर्त्यांचे अकाउंट डीफॉल्टनुसार प्रायव्हेट ठेवले जाणार आहेत. यामुळे इंस्टाग्रामवर जाहिरातदारांना लिंग, वय आणि लोकेशन डेटा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे 18 वर्षाखालील वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (instagram-policy-change-teenagers-account-default-private-and-restrict-advertisers)

18 वर्षांखालील लोकांची खाती खासगी

इंस्टाग्राम 18 वर्षाखालील सर्व वापरकर्त्यांची खाती डीफॉल्टनुसार प्रायव्हेट करेल. इन्स्टाग्रामवर प्रायव्हेट खाते असणे म्हणजे वापरकर्ते त्यांच्या पोस्टवर कोण पाहू शकतो आणि कमेंट करु शकतो यावर नियंत्रण ठेवू शकतो. नवीन फॉलोवर्सना त्यासाठी परवानगी द्यावी लागेल. यासह, सार्वजनिक इन्स्टाग्राम फीडमध्ये खासगी खात्याच्या पोस्ट दिसणार नाहीत. हे फीचर डीफॉल्टनुसार नवीन वापरकर्त्यांसाठी लागू होईल.

16 वर्षाखालील आणि आधीच इन्स्टाग्रामवर पब्लिक खाते असणाऱ्या वापरकर्त्यांना त्यांचे अकाउंट प्रायवेट करण्यास भाग पाडले जाणार नाही. त्याऐवजी, त्यांना प्रायवेट अकाउंटचे फायदे आणि त्यांची प्रायव्हसी सेटिंग्ज कशी बदलता येईल याबद्द नोटिफीकेशन पाठवण्यात येईल.

प्रायवेट खात्यांना महत्व देणार

इन्स्टाग्रामच्या स्वतःच्या चाचणीनुसार, दहा पैकी आठ तरुणांनी साइन-अप करताना खासगी डीफॉल्ट सेटिंग्ज निवडल्या आहेत. इंस्टाग्रामचे हे नवे बदल दक्षिणपूर्व आशिया आणि भारतामधील सर्व वापरकर्त्यांसाठी लागू होतील आणि प्लॅटफॉर्मवर साइनअप झाल्यावर प्रत्येकाल वय टाकावे लागेल. इतकेच नाही तर या वापरकर्त्यांकडे नेहमीच पब्लिक अकाउंटवर स्विच करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

इंस्टाग्रामच्या सार्वजनिक धोरण संचालक करिना न्यूटन यांनी सांगीतले की, त्यांनी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्यामुळे संशयास्पद वागणूक दर्शविणारे अकाउंट शोधण्याची आणि त्या अकाउंट्सना तरुण वापरकर्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करेल. संभाव्य संशयास्पद वर्तन म्हणजे एखाद्या तरुणाने नुकतेच एखाद्या अकाउंटला ब्लॉक केले असेल तर किंवा रिपोर्ट केले गेले असेल अशी खाती संशयास्पद ठरवली जातील. संभाव्य संशयास्पद म्हणून रिपोर्ट झालेल्या अकाउंटना 'फॉर यू' टॅबमध्ये कमी वयाच्या वापरकर्त्यांचे अकाउंट आणि रील्स इन्स्टाग्रामकडून दाखवण्यात येणार नाहीत.

हेही वाचा: नोकियाचा वॉटरप्रुफ 5G फोन लॉंच, पडला तरी होणार नाही काहीच

नवे फीचर

जाहिरातदार 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या वापरकर्त्यांच्या अकाउंटना वापरकर्त्याच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या अॅप्स आणि वेबसाइटवरील त्यांच्या सर्चच्या आधारित टार्गेट करू शकणार नाहीत . इंस्टाग्रामनुसार वापरकर्त्यांची ही माहिती यापुढे जाहिरातदारांना उपलब्ध होणार नाही. हे बदल ग्लोबल असतील आणि इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरला लागू होतील. 18 वर्षाखालील वापरकर्त्यांना जाहिरातींसाठी टार्गेट करण्यासाठी केवळ तीन निकषांना इन्स्टाग्राम परवानगी देईल ते म्हणजे वय, लिंग आणि स्थान.

जर एखाद्या संशयास्पद प्रौढ व्यक्तीने एखाद्या वापरकर्त्याचे खाते शोधण्यासाठी वापरकर्त्याचे नाव टाइप केले असेल तर सर्च रिझल्ट दाखवले जाणार नाहीत. हे नवे तंत्रज्ञान इतर कोणत्या ठिकाणी वापरता येईल याचा शोध सुरु असल्याचे देखील इंस्टाग्राम कडू सांगण्यात आले आहे. इंस्टाग्राममध्ये केले जाणारे हे बदल अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटन आणि जपानमध्ये सुरू केले जातील आणि लवकरच त्या अधिकाधिक देशांमध्ये वाढविण्यात येतील.

(instagram-policy-change-teenagers-account-default-private-and-restrict-advertisers)

हेही वाचा: फोनमधील धोकादायक App शोधा Googleच्या मदतीने, 'ही' आहे पध्दत

loading image
go to top