
instagram pg13 update stops teens from chhapri content parents full control
esakal
Instagram P13 Feature : आता इंस्टाग्रामला वाह रे इंस्टाग्राम! म्हणायची वेळ आली आहे..यामागे मोठे कारण आहे. सोशल मीडियाच्या जगातील ही सुपरहिट अॅप आता तुमच्या 13 ते 17 वर्षांच्या मुलांना 'छपरी' बनण्यापासून रोखणार आहे. मेटा कंपनीने आज आणलेले सर्वात भन्नाट अपडेटमध्ये किशोरवयीन मुलांना PG-13 कंटेंटपर्यंत मर्यादित केलंय. म्हणजे असभ्य गप्पा, धोकादायक स्टंट, ड्रग्जच्या फोटो किंवा हानिकारक व्हिडिओज आता त्यांच्या फीडमध्ये दिसणारच नाहीत.. आणि हे सगळं डिफॉल्टनुसार ऑन राहील मुलं स्वतःहून बंद करू शकणार नाहीत पालकांची परवानगी घ्यावी लागेल