
Instagram Accounts Feature: जर तुमच्या घरात कोणताही किशोरवयीन मुलगा इन्स्टाग्राम वापरत असेल तर आता त्याच्यावर लक्ष ठेवू शकाल. फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया कंपन्यांची मूळ कंपनी मेटाने भारतात Instagram Teen Account'फीचरचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. हे अॅड-ऑन अकाउंट किशोरवयीन मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करेल आणि पालकांना त्यांची मुले सुरक्षित असल्याची खात्री देईल. ही वैशिष्ट्ये १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्ससाठी उपलब्ध असतील. Instagram Teen Account च्या फायद्यांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.