World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Fastest Internet Speed Ever: या देशाने इंटरनेट स्पीडमध्ये नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करत 1.02 पेटाबाइट्स प्रति सेकंद वेग प्राप्त केला आहे, जो भारताच्या तुलनेत तब्बल 1.6 कोटी पट अधिक आहे.
Fiber Optic Speed Record
Fiber Optic Speed Recordsakal
Updated on

थोडक्यात:

  1. जपानच्या संशोधकांनी 1.02 पेटाबाइट्स प्रति सेकंदचा विक्रमी इंटरनेट स्पीड साध्य केला आहे, जो भारताच्या सरासरी वेगाच्या 1.6 कोटी पट जास्त आहे.

  2. हा अफाट वेग डिजिटल क्षेत्रात AI, IoT, स्मार्ट सिटी, आरोग्यसेवा आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत क्रांती घडवू शकतो.

  3. हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी नेटवर्क सुधारणा, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय मानकांची गरज भासणार आहे.

टेक्नोलॉजीमध्ये नेहमी पुढे असलेल्या जपानने जगाला पुन्हा अचंबित केले आहे. नुकतेच जपानने इंटरनेटच्या वेगाची नवी सीमा गाठली आहे. एका ताज्या अहवालानुसार, जपानमधील संशोधकांनी प्रति सेकंद 1.02 दशलक्ष गिगाबाइट्स (GB) डेटा डाउनलोड करण्याचा विक्रम केला आहे.

हा स्पीड इतका अफाट आहे की, जगातील कोणत्याही सामान्य इंटरनेट कनेक्शनपेक्षाही लाखो पटीने जास्त आहे. या वेगाने तुम्ही पापणी लवण्याच्या आतच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कोणताही चित्रपट किंवा संपूर्ण सिरीज डाउनलोड करू शकता. एवढेच नाही, तर 'Warzone' सारखा तब्बल 150 GBचा गेमही 1 सेकंदात डाउनलोड होऊ शकतो.

विक्रमी इंटरनेट स्पीडबद्दल

जपानच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन अँड कम्युनिकेशंस टेक्नोलॉजीमधील संशोधकांनी या स्पीडचा शोध लावला आहे. उत्कृष्ट ऑप्टिक फायबर टेक्निक आणि अत्याधुनिक सिग्नल प्रोसेसिंगचा वापर करून तयार केलेल्या या टेक्निकचा स्पीड अमेरिकेच्या सरासरी इंटरनेट स्पीडपेक्षा 3.5 पट तर भारताच्या सरासरी इंटरनेट स्पीडपेक्षा तब्बल 1.6 कोटी पट जास्त आहे.

एवढेच नाही तर जगातील सर्वसाधारण इंटरनेटपेक्षाही हा 100000 पट जास्त वेगवान आहे. आणि म्हणूनच तुम्ही 100000 पेक्षा जास्त अल्ट्रा-हाय-डेफिनेशन, 4k चित्रपट डाउनलोड करू शकता.

डिजिटल भविष्य

हे नवीन तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि जगभरातील वाढत्या डिजिटल गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाचा वाटा उचलेल. यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्प, दूरस्थ आरोग्य सेवा आणि ऑनलाइन शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व प्रगती होईल.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर यामुळे मोठी वैद्यकीय माहिती लगेच एकमेकांना पाठवू शकतील. यामुळे, दूर राहूनही ऑपरेशन करणे किंवा लगेच कोणता आजार आहे हे शोधणे सोपे होईल. स्मार्ट शहरांमध्ये (जिथे तंत्रज्ञानाचा वापर जास्त होतो), हे नवीन तंत्रज्ञान गाड्यांची ये-जा सांभाळायला, वीज कशी वापरली जाते हे बघायला आणि सुरक्षितता वाढवायला खूप मदत करेल. त्याचबरोबर, जगभरात व्यवसाय करताना किंवा एकमेकांशी बोलताना माहितीची देवाणघेवाण वेगाने होईल, ज्यामुळे कामाची गती आणि फायदा खूप वाढेल.

आव्हाने आणि भारताची स्थिती

या तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात आणण्यात काही आव्हाने आहेत. सध्याच्या नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यासाठी मल्टी-कोर फायबर आणि अत्याधुनिक हार्डवेअरमध्ये मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असेल. हे तंत्रज्ञान सामान्य ग्राहकांसाठी परवडणारे बनवणे आणि आंतरराष्ट्रीय मानके निश्चित करणे हे देखील एक कठीण काम असेल.

भारताच्या इंटरनेट वापराच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) एका अभ्यासानुसार, ग्रामीण भागातील 15 वर्षांवरील 76.3% महिला मोबाईल फोन वापरतात, परंतु त्यापैकी 48.4% महिलांकडे स्वतःचा फोन नाही.

FAQs

  1. जपानने कोणत्या वेगाचा इंटरनेट स्पीड विक्रम केला आहे? (What is the internet speed record recently set by Japan?)
    1.02 पेटाबाइट्स प्रति सेकंद, म्हणजेच 1.02 दशलक्ष GB प्रति सेकंद.

  2. हा वेग भारताच्या इंटरनेट स्पीडपेक्षा कितीपट जास्त आहे? (How much faster is Japan’s new internet speed compared to India’s average internet speed?)
    सुमारे 1.6 कोटी पट अधिक.

  3. या वेगामुळे कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये प्रगती होऊ शकते? (Which sectors can benefit from this ultra-fast internet speed?)
    स्मार्ट सिटी, वैद्यकीय सेवा, ऑनलाइन शिक्षण, व्यवसाय, आणि डिजिटल कम्युनिकेशन.

  4. हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती आव्हानं आहेत? (What are the challenges in bringing this technology to the masses?)
    नेटवर्क सुधारणा, उच्च खर्च, हार्डवेअर अपग्रेड्स आणि आंतरराष्ट्रीय मानकांची गरज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com