iPhone 15 Pro Max चा फर्स्ट लूक होतोय भन्नाट व्हायरल, लूक बघून तुम्हीही म्हणाल...l iPhone 15 Pro Max first look viral on social media you will fall in love with it | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iPhone 15 Pro Max

iPhone 15 Pro Max चा फर्स्ट लूक होतोय भन्नाट व्हायरल, लूक बघून तुम्हीही म्हणाल...

Apple या वर्षी आपली iPhone 15 सीरीज लॉन्च करणार आहे. या मालिकेत चार मॉडेल्स (iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max) असतील. या मालिकेतील टॉप मॉडेल iPhone 15 Pro Max चे 3D मॉडेल ऑनलाइन लीक झाले आहेत. असे कळते आहे की थीक बॉडीसह हा फोन लाँच होणार असून यात एकही फिजीकल बटण नसणार आहे. शनिवारी एका ट्विटमध्ये, टिपस्टर आइस युनिव्हर्सने 3D मॉडेल पोस्ट केले आणि लिहिले, फ्रेम iPhone 13 Pro Max च्या तुलनेत ही फ्रेम पातळ आहे.

या फोनमध्ये कुठलेही फिजिकल बटण नसेल

फ्रॉस्टेड प्रोसेस सह टायटॅनियम अलॉय मिडल फ्रेम, टाइप सी असा हा मोबाईल असणार ज्यात एकही फिजीकल बटण नसणार. यापूर्वी, अशी अफवा होती की iPhone 15 Pro Max स्मार्टफोनमध्ये Samsung चे 2,500 nits डिस्प्ले पॅनल असेल. म्हणजेच तुम्हाला फोनमध्ये उत्कृष्ट ब्राइटनेस मिळेल. (Technology)

गेल्या महिन्यात, असे वृत्त आले होते की लेटेस्ट iPhone 15 Pro Max मध्ये पेरिस्कोप फोल्डिंग झूम कॅमेरा असेल, आणि तो फक्त टॉप-एंड iPhone मॉडेलमध्ये समाविष्ट केला जाईल.

फोनच्या संदर्भात आणखी अनेक बातम्या समोर आल्या आहेत. एका अहवालात नमूद केले आहे की आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स मॉडेल्समध्ये हॅप्टिक फीडबॅकसह सॉलिड-स्टेट बटणे, टायटॅनियम फ्रेम आणि एक्सेस रॅम यासारख्या नवीन वैशिष्ट्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.