
आयफोन प्रेमींसाठी खुशखबर आहे.
कारण आयफोन 16 Pro स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे
iPhone 17 लॉन्च होण्यापूर्वी हा डिस्काउंट मिळतोय
आयफोन प्रेमींसाठी खुशखबर आहे. अॅपलच्या आयफोन 16 प्रो स्मार्टफोनवर फ्लिपकार्टच्या फ्रीडम सेलमध्ये आकर्षक डिस्काउंट जाहीर झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च झालेल्या या फ्लॅगशिप मॉडेलची मूळ किंमत 1,19,900 रुपये होती पण आता ही किंमत 15,000 रुपयांनी कमी करून 1,04,900 रुपये इतकी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बँक ऑफर आणि एक्सचेंज योजनेंमुळे हा फोन 1 लाख रुपयांच्या खाली उपलब्ध आहे. पुडच्या महिन्यात आयफोन 17 सिरिज लॉन्च होण्यापूर्वी ही ऑफर ग्राहकांसाठी मोठी संधी आहे.