iPhone 16 Launch Event : खुशखबर! उद्या लाँच होतीये बहुचर्चित iPhone 16 सीरिज, 'Apple Glowtime' इवेंटमध्ये नेमकं काय खास? वाचा

apple glowtime event iphone 16 series launch india timings and live stream : 9 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता होणाऱ्या 'Apple Glowtime' कार्यक्रमात Apple आपली बहुचर्चित iPhone 16 मालिका लाँच करणार आहे.
apple glowtime event iphone 16 series launch india
apple glowtime event iphone 16 series launch indiaesakal
Updated on

iPhone 16 Series Launch : टेक प्रेमींच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या महिन्याभरापासून ज्या स्मार्टफोन सीरिज लॉंचची प्रतिक्षा होती तो दिवस जवळ आला आहे. 9 सप्टेंबरला रात्री 10:30 वाजता (IST) होणाऱ्या 'Apple Glowtime' कार्यक्रमात Apple आपली बहुचर्चित iPhone 16 सीरिज लाँच करणार आहे. या कार्यक्रमात 4 वेगवेगळे iPhone 16 मॉडेल्स आणि इतर नवीन उपकरणेही पाहायला मिळणार आहेत.

या कार्यक्रमात नेमकं काय आहे खास?

iPhone 16 सीरिज : अत्याधुनिक A18 प्रो चिपसेटसह ही सीरिज गेम चेंजर ठरू शकते.

iPhone 16: पारंपरिक डिझाईनमध्ये नवीन चमक असेल. यात 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि 5 वेगवेगळे रंग उपलब्ध असणार आहे.

iPhone 16 Plus: मोठा डिस्प्ले पण थोडी कमी बॅटरी क्षमतेसह गेमर्स आणि स्ट्रीमर्ससाठी हा उत्तम पर्याय असेल.

iPhone 16 Pro आणि Pro Max: प्रीमियम मॉडेल्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि बॅटरी आयुष्यात वाढ होणार. 'डेझर्ट टायटॅनियम' हा नवीन रंगही यात उपलब्ध होणार आहे.

Apple Watch Series 10: आरोग्य आणि फिटनेस क्षेत्रात आणखी एक उत्तम वॉच येणार आहे.

AirPods 4: दोन नवीन आवृत्तींमध्ये लाँच होणार आहे.

apple glowtime event iphone 16 series launch india
Online KYC Update : बँक अकाउंट KYC साठी रांगेत थांबताय? आता घरबसल्या मोबाईलवरून करा केवायसी अपडेट,वाचा सोपी प्रोसेस

iPhone 16 मालिकेत काय आहे खास?

यावर्षी येणारी iPhone 16 मालिका लाँच होण्याआधीच चर्चेत आहे. यामध्ये काही खास अपग्रेड्स असणार आहेत. सर्वात जास्त चर्चा असलेली गोष्ट म्हणजे या नव्या iPhone मध्ये iOS 18 आधीपासूनच प्री-इन्स्टॉल केलेले असेल. त्यामुळे नवीन फोन घेतला की झटपट नवीन सॉफ्टवेअर अपडेट करण्याची गरज नाही. Pro मॉडेल्समध्ये तर Apple ची 'Apple Intelligence' ही अगदी वेगळीच गोष्ट पाहायला मिळू शकेल. या फीचरमुळे आपण आपल्या फोनने संवाद साधण्याची पद्धतच बदलू शकेल. पण ही सुविधा लाँचच्या वेळी नसून कदाचित ऑक्टोबरमध्ये येऊ शकेल अशीही शक्यता आहे.

apple glowtime event iphone 16 series launch india
Whatsapp Discontinue : लवकरच बंद होणार व्हॉट्सॲपचे जुने व्हर्जन; कंपनीने ट्विट करत दिली माहिती,कसा सुरक्षित कराल तुमचं डेटा? लगेच पाहा

भारतातील Apple चाहते Apple ची वेबसाइट किंवा Apple TV अॅपद्वारे हा कार्यक्रम थेट पाहू शकतात. रात्री 10:30 वाजता (IST) पासून सुरुवात होणारा हा कार्यक्रम एकदम खास असणार आहे.

Apple च्या या कार्यक्रमामुळे iPhone 16 मालिकेची चर्चा चांगलीच रंगत आली आहे. तुम्ही क्लासिक डिझाईन पसंत करणारे असो, मोठा डिस्प्ले असलेला फोन शोधणारे असो, किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान पसंत करणारे असो, Apple तुमच्यासाठी काहीतरी खास गोष्ट आणणार आहे. तर मग, नवीन जनरेशनच्या iPhones साठी तुम्ही सज्ज आहात ना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.