

iPhone 17 Pro Max discount offer
esakal
ॲपलने नेहमीच आपल्या डिझाईनने जगभरातील युजर्सना भुरळ घातली आहे, पण iPhone 17 Pro Max ने हे तंत्रज्ञान एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. यावेळी कंपनीने फोनच्या बाहेरचे डिझाईन 'हीट फोर्ज्ड ॲल्युमिनियम युनिबॉडी'चा वापर केला आहे, ज्यामुळे हा फोन हातात पकडताना कमालीचा प्रीमियम आणि हलका वाटतो.
६.९ इंचाचा भव्य सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि अत्यंत बारीक बेझल्समुळे स्क्रीनवरील प्रत्येक दृश्य जिवंत वाटते. याशिवाय 'कॉस्मिक ऑरेंज' आणि 'डीप ब्लू' सारख्या नव्या रंगछटांमुळे हा फोन गर्दीतही उठून दिसतो.