

iPhone 18 pro max sale in India
sakal
मार्केटमध्ये नुकताच लाँच झालेल्या iPhone 18 pro आणि iPhone 18 pro maxची विक्री आज देशात सुरु झाली आहे. हा फोन घेण्यासाठी भारतातल्या सगळ्याच स्टोअर्सच्या बाहेर पहाटेापासूनच ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या. पण हा नवा iPhone घ्यायचा म्हणून कुणी ऑफिसमधून सुट्टी घेतली, कुणी तासन्तास रांगेत उभं राहिलं… पण एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी iPhone 18 Pro घेण्यासाठी चक्क सोनंच विकलं! iPhone 18 Pro भारतात विक्रीसाठी येताच ग्राहकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. नोएडाच्या Apple Store बाहेर पहाटेपासूनच मोठी गर्दी होती आणि याच गर्दीत दिल्लीतील या व्यक्तीने सांगितलेली गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.