'आयफोन 7"ची ऑक्‍टोबरमध्ये एंट्री

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016

सान फ्रान्सिस्को- आयफोनचे नेक्‍स्ट जनरेशन असलेले "आयफोन 7" आणि "आयफोन 7 प्लस" हे दोन स्मार्टफोन्स पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे. "ऍपल 7"ची किंमत जवळपास 60 हजारांच्या आसपास असून आयफोन 7 प्लसची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
 
नुकताच ऍपलने या दोन्ही फोन्सचे दणक्‍यात अनावरण केले. याशिवाय ऍपल स्मार्टवॉचचेही कंपनीने लॉंचिंग केले. गेल्या वर्षभरात भारतीय बाजारात आयफोनची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असून "आयफोन 7" च्या विक्रीबाबत कंपनी आशावादी आहे. "आयफोन 7"मध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये असून 16 सप्टेंबरपासून यासाठी आगाऊ नोंदणी करता येणार आहे. 7 ऑक्‍टोबरपासून त्याची विक्री सुरू होणार आहे. 32 जीबीच्या आयफोन 7 मॉडेलची 60 हजारांपासून किंमत आहे. या फोनसोबत नव्याने लॉंच करण्यात आलेले वायरलेस इअरपॉड्‌सदेखील सवलतीत दिले जाणार आहेत. 

"आयफोन 7" 

4.5 इंची थ्रीडी डिस्प्ले 

12 मेगापिक्‍सेल कॅमेरा 

हायस्पीड सेन्सर 

4 के व्हीडिओ रेकॉर्डिंग 

"आयफोन 7" 

5.5 इंची थ्रीडी डिस्प्ले 

12 मेगापिक्‍सेल कॅमेरा 

ड्युअल कॅमेरा 

आयफोन 5एस, आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस या फोन्सची कंपनीने बंद केली आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवरून हे तीनही मॉडेल्स काढून टाकले असून यापुढे त्यांची विक्री होणार नाही. त्यामुळे तुलनने स्वस्त असलेले आयफोन ग्राहकांना उपलब्ध होणार नाहीत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iPhone 7 to hit India's market in October 2016