iPhone Air Buying Tips
esakal
विज्ञान-तंत्र
iPhone Air! अॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच
iPhone Air Buying Tips : अॅपलचा iPhone Air कुणी खरेदी करावा आणि कुणी घेऊ नये, जाणून घ्या
गेल्या आठवड्यातच आयफोन 17 लॉंच झाले.
यामध्ये एक खास फोन आला iPhone Air
पण हा मोबाईल कुणी घ्यावा आणि कुणी घेऊ नये, जाणून घ्या
iPhone Air : अॅपलने आपला नवीन स्मार्टफोन आयफोन एअर लॉंच केला आहे, जो डिझाइन आणि पोर्टेबिलिटीच्या बाबतीत एकदम बेस्ट आहे. हा फोन त्याच्या अत्यंत पातळ आणि हलक्या रचनेमुळे मार्केटमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. स्टायलिश लूक आणि प्रीमियम फीलसह हा फोन खास डिझाइनप्रेमी, व्यावसायिक आणि प्रवास करणाऱ्यांसाठी बनवला आहे. मात्र यात केवळ एकच कॅमेरा, मर्यादित बॅटरी लाइफ आणि खास सॉफ्टवेअरचा अभाव यामुळे हा प्रत्येकासाठी नाही. मग हा आयफोन एअर खरंच कोणासाठी आहे?