आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच येतोय खिशाला परवडणारा 5G iPhone | iPhone SE (2022) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच येतोय खिशाला परवडणारा 5G iPhone

नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 13 सीरीजने जगभरात धुमाकूळ घातला असताना iPhone प्रेमींसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच Apple कंपनी त्यांचा पहिला परवडणारा 5G iPhone स्मार्टफोन मॉडेल लॉंन्च करणार आहे. या नवीन स्मार्टफोनबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. या iPhone मध्ये कंपनीचा सर्वात फास्ट चिपसेट देण्यात येणार आहे. चला तर मग आयफोनच्या नवीन मॉडेलबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

एका मार्केट रिसर्च फर्मच्या दाव्यानुसार, iPhone SE (2022) 2022 च्या पहिल्या तिमाहीत 5G कनेक्टिव्हिटीसह लॉंच केला जाऊ शकतो. Apple च्या iPhone SE (2022) मॉडेलमध्ये Apple ची A15 बायोनिक चिप देण्यात येईल, जे मागील मॉडेलपेक्षा चांगली कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी लाईफ देतो. तसेच स्मार्टफोनमध्ये टच आयडी बटण आणि मोठ्या बेझलसह iPhone SE (2020) सारखाच डिस्प्ले असेल असा दावा केला जात आहे. रिसर्च फर्म TrendForce च्या रिपोर्टनुसार, Apple 2022 च्या पहिल्या तिमाहीत iPhone SE स्मार्टफोनचे थर्ड जनरेशन लॉन्च करेल. हा अंदाज मागील काही रिपोर्टनुसार लावण्यात येत आहे.

हेही वाचा: बजेटमध्ये बसणारी इलेक्ट्रिक बाइक शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

iPhone SE (2022) मध्ये काय खास असेल

कंपनी आपल्या लेटेस्ट iPhone SE मॉडेलला जुन्या मॉडेलप्रमाणेच ट्रीटमेंट देऊ शकते, म्हणजेच iPhone SE (2022) मध्ये तेच जुने डिझाईन पाहायला मिळू शकते. सोबतच Apple चा 5nm A15 Bionic चिपसेट (जो iPhone 13 सीरीजमध्ये देखील आहे) देण्यात येईल, त्यामुळे हा कंपनीचा पहिला सामान्यांच्या बजेटमध्ये बसेल असा 5G-इनेबल्ड स्मार्टफोन असेल. A15 बायोनिक चिपसेट सध्या Apple ची सर्वात वेगवान मोबाइल चिप असून यामध्ये दोन हाय परफॉर्मंस कोर आणि दोन एफिशीयंसी कोर असलेले हेक्सा-कोर SoC आहे. त्याच वेळी, 4G इनेबल्ड iPhone SE (2020) मध्ये 7nm A13 बायोनिक चिपसेट आहे जो iPhone 11 सीरीजमध्ये दिला होता.

हेही वाचा: रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

पुढील वर्षी लॉन्च होणार नवीन iPhone

असे सांगितले जात आहे की, कंपनी पुढील वर्षी आपला iPhone SE मॉडेल लॉन्च करू शकते. आत्तापर्यंत लॉन्च झालेल्या iPhone SE ची किंमत रेंज पाहिल्यास, आगामी iPhone SE हा सर्वात स्वस्त 5G iPhone असेल. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या iPhone SE मध्ये A13 चिपसेट दिला होता. त्याच वेळी, नवीन फोनमध्ये आपल्याला A15 चिपसेट पाहायला मिळेल जो या वर्षी लॉन्च झालेल्या iPhone 13 सारखा असेल.

असेही सांगितले जात आहे की, 2022 मध्ये लॉन्च होणार्‍या iPhone SE चे डिझाईन हे अगदी iPhone SE 2020 सारखेच असेल. नवीन iPhone SE मध्ये तुम्हाला एक लहान 4.7-इंचाचा डिस्प्ले, भरपूर बेझल्स पाहायला मिळू शकतात. इतकंच नाही तर नवीन iPhone SE मध्ये होम बटणावर फिंगरप्रिंट देखील दिसू शकतो. याशिवाय यासोबत iPhone SE Plus देखील लॉन्च केला जाऊ शकतो असे बोलले जात आहे. सध्या, याबद्दल फक्त लिक झालेली माहिती वरुन अंदाज लावण्यात येत आहेत . अॅपलकडून याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही.

टॅग्स :iphone