बजेटमध्ये बसणारी इलेक्ट्रिक बाइक शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

Revolt RV 400
Revolt RV 400

इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. दुसरीकडे, सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलतीही देत ​​आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक बाइक (Electric Bike) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मोटरसायकलबद्दल सांगणार आहोत. किंमत कमी असून देखील या बाईक्स एकदा चार्ज केल्यास चांगले अंतर चालतात, चला तर मग जाणून घेऊ सविस्तर..

रिव्हॉल्ट RV 400 ते Odysse Evoqis आणि Joy e-bike Monster या देशात विक्रीसाठी असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मोटरसायकल्स आहेत. आज आम्ही तुम्हाला या बाइक्सचे परफॉर्मन्स, रेंज आणि चार्जिंग यांसारख्या फीचर्स किंमतीबद्दल सांगणार आहोत जेणेकरु तुम्ही तुमची आवडीची इलेक्ट्रिक बाइक तुमच्या बजेटनुसार निवडू शकाल.

रिव्हॉल्ट आरव्ही 400 (Revolt RV 400)

Revolt RV 400 ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च झालेली पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे, त्यानंतर आता इतर कंपन्यांच्या अनेक इलेक्ट्रिक बाइक्स बाजारात लाँच करण्यात आल्या आहेत आणि येत्या काळात आणखी इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाइक्स देखील बाजारात उपलब्ध होतील.

दरम्यान Revolt RV 400 बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4.5 तास वेळ लागतो. तसेच या बाइकची टॉप स्पीड 80 किमी प्रतितास असून ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर, रिव्हॉल्ट RV 400 इलेक्ट्रिक बाइक सिंगल चार्जवर 150 किमी पर्यंत चालते. चांगल्या राइडिंग एक्सपिरियंससाठी यात तीन मोड दिले आहेत. ज्यामध्ये ईसीओ, नॉर्मल आणि स्पोर्टचा मोड वापरकर्त्यांना मिळेल. सोबतच कंपनीने दावा केला आहे की, 100 किलोमीटरसाठी या इलेक्ट्रिक बाइकचा खर्च फक्त 9 रुपये असेल. दुसरीकडे, जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक बाइकची किंमत शोरुमध्ये 90,799 रुपये आहे.

Revolt RV 400
बजेटमध्ये मिळतात 'या' सर्वात जास्त मायलेज देणार्‍या एसयूव्ही

ओडिसी इव्होकिस (Odysse Evoqis)

Odysse Evoqis इलेक्ट्रिक बाइक 4 ड्राइव्ह मोड आणि 5 कलर ऑप्शन्ससह बाजारात उपलब्ध आहे. Odysse Evoqis इलेक्ट्रिक बाइकमध्ये 4.32 kW ची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे, जी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तास घेते. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर 3000 W ची इलेक्ट्रिक मोटर 4.3 KW पॉवर आणि 64 Nm पीक टॉर्क जनरेट करु शकते.

फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Odysse Evoqis EV मध्ये अँटी थेफ्ट लॉक, मोटर कट ऑफ स्विच आणि कीलेस एंट्री सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. त्याच वेळी, याला ताशी 80 किलोमीटरचा टॉप स्पीड असून कंपनीचा दावा आहे की एका चार्जिंगवर ही बाइक 140 किमी चालेल. Odysse Evoqis ची एक्स-शोरूम किंमत 1.64 लाख रुपये आहे.

Revolt RV 400
तुमची डिझेल कार कनव्हर्ट करा इलेक्ट्रिकमध्ये; जाणून घ्या पध्दत

जॉय ई-बाईक मॉन्स्टर (Joy e-bike Monster)

कंपनीचा दावा आहे की या बाइकवर तुम्हाला 1 किलोमीटर प्रवास करण्यासाठी फक्त 24 पैसे मोजावे लागतील. त्यानुळे तुम्ही 10 रुपयांमध्ये 40 किलोमीटरचा प्रवास करू शकता.

या बाइकमध्ये पॉवरसाठी लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. त्याच वेळी, यात 250W ची DC ब्रॅशलेस हब मोटर दिली आहे. या इलेक्ट्रिक बाइकला फुल चार्ज करण्यासाठी 4 ते 4.5 तास लागतात. रेंजच्या बाबतीत, जॉय ई-बाईक मॉन्स्टर इलेक्ट्रिक बाइक सिंगल चार्ज केल्यास 75 किमी चालते. कंपनीच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर या इलेक्ट्रिक बाईकवर 280 किमी प्रवासाचा खर्च फक्त 70 रुपये येईल. याशिवाय या इलेक्ट्रिक बाइकची किंमत 98,666 रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com