

iPhone hack warning
Why iPhone Users Are at Risk of Hacking : सरकार आणि 'अॅपल'ने आयफोन युजर्ससाठी एक नवीन इशारा जारी केला आहे. आयफोनच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये आढळलेल्या एका दोषामुळे ही नवीन चेतावणी देण्यात आली आहे. खरंतर अॅपल आयफोन सामान्यतः अँड्रॉइड फोनपेक्षा अधिक सुरक्षित मानले जातात, परंतु आता iOS मध्ये आढळलेल्या एका दोषामुळे तुमचा आयफोन हॅक होऊ शकतो. सरकारच्या या इशाऱ्यानंतर अॅपलनेही लाखो आयफोन युजर्सना इशारा दिला आहे.
अॅपलने आयफोन युजर्सना दिलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे की, युजर्सन त्यांचे डिव्हाइस लेटेस्ट iOS 26 व्हर्जनमध्ये अपडेट करावेत अन्यथा त्यांचे आयफोन हॅकर्सचे लक्ष्य बनू शकतात. अॅपल च्या अधिकृत सुरक्षा सल्लागारानुसार, iOS मधील वेबकिट नावाच्या सिस्टम कंपोनेंटमध्ये झिरो-डे गडबड आढळली आहे, ज्यामुळे हॅकर्स युजर्सच्या डिव्हाइसचा सहज अक्सेस मिळवू शकतात.
वेबकिट हे असे टूल आहे जे अॅपलच्या सफारी वेब ब्राउझर आणि आयफोनवरील इतर सर्व ब्राउझर व वेब-आधारित अॅप्सना ऑपरेट करते. जर हॅकर्सना यामध्ये आढळलेल्या त्रुटीबद्दल समजले तर ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. हॅकर्स आयफोनवर कोड चालवून युजर्सच्या डेटामध्ये प्रवेश करू शकतात. खरंतर हॅकर्सनी याआधी लक्ष्यित हल्ले करण्यासाठी या असुरक्षिततेचा गैरफायदा घेतलेला आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी, अॅपलने अलीकडेच एक नवीन सुरक्षा अपडेट जारी केले आहे.
अॅपलच्या सल्ल्यानुसार, भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी, CERT-In ने देखील iPhones आणि iPads साठी हायरिस्क चेतावणी जारी केली आहे. CERT-In ने iOS आणि iPadOS मध्ये आढळणाऱ्या अनेक असुरक्षितांवर बोट ठेवले आहे आणि डिव्हाइसेस त्वरित अपडेट करण्याची शिफारस केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.