IPL 2022 पाहा मोफत, Jioने लॉन्च केले सर्वात स्वस्त क्रिकेट प्लॅन | Sci- Tech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Jio announces new plans, rewards for cricket streaming

IPL 2022 पाहा मोफत, Jioने लॉन्च केले सर्वात स्वस्त क्रिकेट प्लॅन

IPL 2022 Jio announces new plans : आईपीएल 2022 सीझन सूरू होत आहे. Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी २७९ चा नवा क्रिकेट अॅड-ऑन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये 15GB मोबाईल डेटा मिळतो आहे. हा अॅड-ऑन प्लॅन पॅक आहे त्यामुळे कोणतेही वाईस कॉलिंग सेवा उपलब्ध नाही. इंटरनेट डेटासह या प्लॅनमध्ये एक वर्ष Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शन मिळतो आहे. रिलाईन्स जिओ 279 रुपयांचा क्रिकेट अॅड-ऑन प्रीप्रेड प्लॅन यूजरच्या उपलब्ध प्लॅनच्या वैधतेपर्यंत ( Validity )अॅक्टिव्ह राहील. (IPL 2022 Jio announces new plans, rewards for cricket streaming)

हेही वाचा: Happiest Zone ठरलेल्या फिनलॅन्डमध्ये लोक इतके खूश कसे?

नवीन प्रीपेड क्रिकेट अॅड-ऑन प्लॅव MyJio अॅपद्वारे उपलब्ध आहे. टेलिकॉम ऑपरेटरने अॅपमध्ये नवीन प्लॅनचे जाहिरात बॅनर लावले आहे. जिओचा 279 रुपयांचा क्रिकेट अॅड-ऑन प्लॅन सध्या केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे हे लक्षात ठेवा.

Jio.com वर सूचीबद्ध केल्यानुसार, कंपनी सध्या 7 वेगवेगळे क्रिकेट प्लॅन ऑफर करत आहे. सर्वात स्वस्त प्लॅन 499 रुपयांपासून सुरू होतो, तर सर्वात महागड्या प्लॅनची किंमत 3,119 रुपये आहे. या सर्व प्लॅनवर एका वर्षासाठी मोफत Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते आहे.

हेही वाचा: युट्यूब चॅनेलचा करा कलात्मक वापर; सोप्या टिप्स

जिओचा 499 रुपयांचा क्रिकेट प्लॅन 28 दिवसांसाठी वैध आहे. हे अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS दैनिक मर्यादेसह दररोज 2GB मोबाइल डेटा ऑफर करते. त्याचप्रमाणे, 555 रुपयांचा क्रिकेट प्लॅन 55 दिवसांसाठी वैध आहे आणि 55 GB इंटरनेट डेटासह येतो. प्लॅनमध्ये एसएमएस किंवा कॉलची सुविधा नाही.

जिओचा 601 रुपयांचा क्रिकेट प्रीपेड प्लॅन 28 दिवसांसाठी वैध आहे. यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह 90GB एकूण इंटरनेट डेटा आणि 100 SMS प्रतिदिन येतो. रिलायन्स जिओच्या 659 रुपयांच्या क्रिकेट प्लॅनमध्ये दररोज 1.5GB मोबाइल डेटा मिळतो. हा प्लॅन 56 दिवसांसाठी वैध आहे आणि यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग डेटाचा समावेश आहे.

हेही वाचा: Vodafone Idea ने लॉन्च केले पॉकेट WIFI, एकावेळी 10 डिव्हाईस करू शकता कनेक्ट

जिओने ऑफर केलेला आणखी एक क्रिकेट प्लॅन रु. 799 रुपयांचा प्लॅन असून त्यांची वैधता 56 दिवसांची आहे. यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 2GB मोबाइल डेटासह मिळतो. यामध्ये रोज १०० SMS सह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा देखील लाभ घेता येतो.

Jio चा Rs 3,119 क्रिकेट प्रीपेड प्लॅन 365 दिवसांसाठी वैध आहे आणि दररोज 2GB मोबाइल डेटासह मिळतो. प्लॅन अंतर्गत यूजर्सला व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह 10GB डेटाचा लाभ देखील मिळेल.

Web Title: Ipl 2022 Jio Announces New Plans Rewards For Cricket Streaming

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..