

how to stop phone from overheating during charging in summer: उन्हाळा सुरू होताच अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. मग ते तुमच्या गॅझेट्सशी संबंधित असो किंवा तुमच्या आरोग्याशी संबंधित असो. अशावेळी आपल्याला गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. वाढत्या तापमानामुळे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे लवकर गरम होऊ लागतात. अशावेळी स्फोट होण्याचा धोका वाढतो. अशावेळी तुमचे डिव्हाइस लवकर खराब होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. यामुळे कधीकधी आपले गॅझेट्स देखील खराब होऊ शकतात. अशावेळी ही समस्या वेळीच सोडवणे महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोबाईल फोन जास्त गरम होतात. यामुळे चार्जिंग मंद होते आणि कधीकधी बॅटरी फुगते आणि स्फोट होतात. वातावरण गरम असल्याने आणि चार्जिंग दरम्याना निर्माण होणारी उष्णता गॅझेटंस आणखी गरम करते. यासमस्येपासून सुटका हवा असेल तर पुढील हॅक्स फॉलो करू शकता.