Israel Tech Companies : इस्राइलमधील टेक कंपन्या युद्धामुळे हैराण, भारतात होऊ शकतात शिफ्ट - रिपोर्ट

Israel Hamas War : गेल्या शनिवारपासून इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे.
Israel Tech Companies
Israel Tech CompanieseSakal

इस्राइल आणि हमासमध्ये गेल्या आठवडाभरापासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. या युद्धामुळे इस्राइलमधील टेक कंपन्या आपापली कार्यालयं दुसरीकडे हलवण्याच्या विचारात आहेत. याचा फायदा भारताला होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

7 ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून इस्राइलवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. यानंतर इस्राइलने युद्धाची घोषणा करत, हमासच्या तळांवर हल्ला सुरू केला. यानंतर सात दिवस झाले हे युद्ध सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत इस्राइल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांच्या हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Israel Tech Companies
Israel-Hamas War : इस्रायली सैन्याकडून 250 ओलिसांची सुटका, 60 हमास दहशतवादी ठार; लाइव्ह ऑपरेशनचा व्हिडीओ केला जारी

500 हून अधिक कंपन्या

इस्राइलमध्ये कित्येक मोठ्या टेक कंपन्यांची कार्यालये आहेत. यामध्ये इंटेल, मायक्रोसॉफ्ट, गुगल यांसह तब्बल 500 हून अधिक कंपन्यांचा समावेश आहे. यामधील काही ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आणि काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग आहेत. या कंपन्या एकत्रितपणे 10 लाखांहून अधिक रोजगार निर्माण करतात. (Tech News)

सोबतच, भारतातील विप्रो आणि टीसीएस अशा मोठ्या कंपन्यांची प्रादेशिक कार्यालये देखील इस्राइलमध्ये आहेत. हमाससोबत सुरू असलेलं युद्ध वाढतच चालल्यामुळे ही सर्व कार्यालये इतर देशांमध्ये हलवण्याचा विचार कंपन्या करत आहेत. यामध्ये इतर देशांसह भारताचा देखील विचार केला जातो आहे. (Global News)

Israel Tech Companies
Israel Cyber War : इस्राइल-पॅलेस्टाईनमध्ये आता 'सायबर वॉर' सुरू; भारताचे हॅकर्सही युद्धाच्या मैदानात - रिपोर्ट्स

टाईम झोनचं गणित

इंडस्ट्री तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्राइलमधील कंपन्या प्रामुख्याने अशाच देशांचा विचार करु शकतात ज्यांचा टाईम झोन इस्राइलसारखाच असेल. यामधील मिडल इस्टचा विचार केला जाण्याची शक्यता कमी आहे. याला दोन कारणं म्हणजे, इस्राइलच्या तुलनेत तेथील महागाई आणि युद्धाचं लोण तिथे पोहोचण्याची शक्यता.

यानंतर दुसरी शक्यता युरोपीय देशांची आहे. त्याशिवाय कित्येक कंपन्यांची भारतात आधीपासूनच कार्यालये आहेत. त्यामुळे या कंपन्या भारताचा पर्याय निवडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com