

Gaganyaan Mission
sakal
बंगळूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) मानवसहित अवकाशयान उड्डाणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांचे सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘ड्रोग पॅराशूट’ प्रणालीची पात्रता चाचणी ‘इस्रो’ने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. शनिवारी (ता. २०) ‘इस्रो’ने याबाबत अधिकृत घोषणा केली.