ISRO INSAT-3DS : इस्रो लाँच करणार देशातील सगळ्यात आधुनिक हवामान आणि डिझॅस्टर वॉर्निंग सॅटेलाईट! तयारी झाली पूर्ण

ISRO Satellite Launch : 17 फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता हे प्रक्षेपण पार पडेल. हे प्रक्षेपण जर तुम्हाला प्रत्यक्ष पहायचं असेल, तर त्यासाठी रजिस्ट्रेशन आज सुरू होणार आहे.
ISRO INSAT-3DS
ISRO INSAT-3DSeSakal

ISRO New Mission : इस्रो सध्या यावर्षीच्या आपल्या दुसऱ्या मोठ्या मोहिमेच्या तयारीत आहे. 17 फेब्रुवारी रोजी INSAT-3DS या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी इस्रोचं GSLV-F14 हे रॉकेट वापरलं जाणार आहे.

17 फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता हे प्रक्षेपण पार पडेल. हा भारताचा सगळ्यात आधुनिक हवामान आणि आपत्ती इशारा देणारा उपग्रह आहे. या उपग्रहाला जिओसिन्क्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये ठेवलं जाईल. हे प्रक्षेपण जर तुम्हाला प्रत्यक्ष पहायचं असेल, तर त्यासाठी रजिस्ट्रेशन आज सुरू होणार आहे. इस्रोने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. (ISRO INSAT-3DS Launch)

या उपग्रहाचा मुख्य उद्देश्य जमीन, समुद्र, हवामान आणि इमर्जन्सी सिग्नल सिस्टीम या गोष्टींची माहिती देणे हा आहे. यासोबतच मदत आणि बचावकार्यातही याचं सहकार्य होणार आहे. इनसॅट-3 सीरीजमध्ये आधीपासून सहा वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह आहेत. आता यामध्ये हा सातवा उपग्रह जोडला जाणार आहे.

ISRO INSAT-3DS
ISRO 2024 Missions : पुढचं वर्षही गाजवणार 'इस्रो'; पहिल्या दिवसापासूनच होणार मोहिमांची सुरुवात! पाहा संपूर्ण यादी

इनसॅट सीरीजच्या आधीच्या सर्व उपग्रहांना 2000 ते 2004 या कालावधीमध्ये लाँच करण्यात आलं होतं. दूरसंचार, टीव्ही ब्रॉडकास्ट आणि हवामानासंबंधित माहिती यामुळे मिळत होती. आता यामध्ये आणखी एक आधुनिक उपग्रह जोडण्यात येईल.. हा उपग्रह मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com