ISRO : मोहीम जाहली शतकी; ‘इस्रो’कडून जीएसएलव्ही-एफ१५चे यशस्वी प्रक्षेपण
GSLVF 15 : इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून बुधवारी सकाळी जीएसएलव्ही-एफ१५चे यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणाने भारताच्या अंतराळ योजनेसाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने (इस्रो) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून बुधवारी सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी जीएसएलव्ही-एफ१५चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.