ISRO Successfully Tests: इस्रोची गगनयान मोहिमेसाठी यशस्वी इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी, चिनूक हेलिकॉप्टरने पाच टनाची कुपी सोडली
Gaganyaan Mission: इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी क्रू कॅप्सूलची इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी यशस्वी झाली. पॅराशूट प्रणालीने वेग कमी करून सुरक्षित उतरविण्याची क्षमता सिद्ध केली.
बंगळूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) आगामी महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेसाठी रविवारी इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी घेण्यात झाली. या चाचणीसाठी चिनूक हेलिकाॅप्टरची मदत घेण्यात आली.