ISRO SSLV Launch : इस्रो 'या' खास अंतराळ मोहिमेसाठी सज्ज! महिन्याच्या अखेरीस लाँच करणार सर्वांत लहान उपग्रह

Satellite Launch : लहान उपग्रह कमी खर्चात आणि जलद गतीने अवकाशात स्थापित करण्यासाठी एक प्रभावी पर्याय आहे.
ISRO's SSLV to Lift Off on Third Mission
ISRO's SSLV to Lift Off on Third Missioneaskal

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारताचे नवीनतम SSLV (स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. लो पृथ्वी कक्षेत लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी या मोहिमेची मोठी आस आहे.

इस्रोच्या सूत्रांनी सांगितलं आहे की, सर्वकाही नियोजनानुसार झालं तर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात या अत्याधुनिक SSLV ची तिसरी उड्डाण मोहीम होऊ शकते. परंतु, श्रीहरीकोटाच्या आसपासच्या वातावरणाच्या परिस्थितीनुसार ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही ढकलली जाऊ शकते.

एसएसएलव्ही ही भारताच्या अंतराळ क्षमतेमध्ये भर घालणारी मोठी झेप आहे. हे लहान उपग्रह कमी खर्चात आणि जलद गतीने अवकाशात स्थापित करण्यासाठी एक प्रभावी पर्याय आहे.

ISRO's SSLV to Lift Off on Third Mission
ISRO Mission: आता 'सूर्या' चंद्रावर जाणार... काय आहे ISRO ची मोहीम? इस्रो प्रमुखांची मोठी माहिती

एसएसएलव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सहा लोकांच्या टीमद्वारे 72 तासांत तयार केले जाऊ शकते. मोठ्या प्रक्षेपनांसाठी महिन्यांची तयारी आणि शेकडो लोकांची आवश्यकता असते. यामुळे SSLVमुळे खर्च कमी होऊन मोहिमांमध्ये वेग येईल आणि भारताच्या व्यावसायिक अंतराळ क्षेत्रात क्रांती होऊ शकते.

एसएसएलव्ही आणखी काही आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. जसे, सर्व्हसॉलिड प्रणोदन टप्पे (propulsion stages) आणि अचूक कक्षीय स्थापनेसाठी लिक्विड प्रोपल्शनवर आधारित व्हेलोसिटी ट्रिमिंग मॉड्यूल (VTM). याचे मॉड्यूलर डिझाइन वेगवेगळ्या ठिकाणी सोयीस्करपणे नेले जाऊ शकते आणि लॉन्चसाठी जलद तयारी करता येते.

ISRO's SSLV to Lift Off on Third Mission
Email Delete : ईमेल्सचा भडिमार झालाय? आता चिंता नाही, एका क्लिकवर डिलीट करा हवे तेवढे ईमेल,वापरा सोपी ट्रिक

ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या प्रारंभीक अडचणीनंतर, इस्रोने फेब्रुवारी 2023 मध्ये SSLV-D2 मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आणि या क्षेत्रातील भारताची क्षमता जगाला दाखवून दिली. या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अधिक संधी निर्माण झाल्या आहेत.

एसएसएलव्ही कार्यक्रम हा भारताच्या अंतराळ क्षेत्रातील व्यापारीकरण आणि स्वदेशी अंतराळ स्टार्टअप्सच्या प्रोत्साहनासारख्या मोठ्या महत्वाकांक्षांशी सुसंगत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com