esakal | भारतात Jaguar F-Paceची बुकिंग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

भारतात Jaguar F-Paceची बुकिंग सुरू

मे महिन्यात मिळणार डिलिव्हरी

भारतात Jaguar F-Paceची बुकिंग सुरू

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मुंबई : जॅग्वार लँड रोवर इंडियाने काही दिवसांपूर्वीच भारतात नवीन 'एफ-पेस'ची बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. जॅग्वारच्या या नव्या एफ-पेसमध्ये नू जनरेशन पीव्‍ही प्रो इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टीम दिला असून त्यात इन-लाइन फोर-सिलिंडर पेट्रोल आणि डिझेल इंजिन्स असे दोन पर्यायदेखील देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे  येत्या मे महिन्यापासून या कारची डिलिव्हरी सुरु करण्यात येणार आहे.

''एफ पेस' ही अपग्रेड केलेली एसयूव्ही प्रकारातील कार असून सप्टेंबर 2020 मध्ये ती बाजारात दाखल झाली होती. आता या कारचं फेसलिफ्ट मॉडेल नवीन मोकओव्हरसह बाजारात आणण्यात आल आहे. या नव्या कारमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. नवीन एफ पेस भारतात 'आर-डायनामिक एस' ट्रीममध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधन प्रकारात उपलब्ध असणार आहे. नवीन एफ पेस भारतात दमदार परफॉर्मन्स आणि अधिक लक्झरियस प्रवासाची अनुभूती देणारी ठरेल", असा विश्वास जॅग्वार लँड रोवर इंडियाचे अध्यक्ष रोहित सूरी यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा : लग्नानंतर समजलं दोघे आहेत बहीण-भाऊ; तरी मोडला नाही संसार, कारण...

इंजिन क्षमता

एफ पेसचे 2.0-लीटर, चार-सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन 243 बीएच पॉवर, 3.0 लीटर, 6-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 330 बीएच पॉवर निर्माण  करते.

भारतात जॅग्‍वार प्रोडक्‍ट पोर्टफोलिओ 

जॅग्‍वारच्‍या भारतातील रेंजमध्‍ये एक्‍सई (XE) (किंमत ४६.६४ लाख रूपयांपासून), एक्‍सएफ (XF) (५५.६७ लाख रूपयांपासून), आय-पेस (I-PACE) (किंमत १०५.९ लाख रूपयांपासून) आणि एफ-टाइप (F-TYPE) (किंमत ९५.१२ लाख रूपयांपासून) या कार्सचा समावेश आहे. उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या सर्व किंमती या भारतातील एक्‍स-शोरूम किंमती आहेत. 
 

loading image