जॅग्‍वारची बहुचर्चित इलेक्ट्रिक 'आय-पेस' एसयूव्ही भारतात दाखल

jaguar land rover launches its first electric vehicle i pace in india 
jaguar land rover launches its first electric vehicle i pace in india 

मुंबई : लक्झरियस आणि तेवढ्याच किमती कारसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जॅग्‍वार लॅण्ड रोव्‍हर (Jaguar and Landrover - JLR) कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक 'आय-पेस' (I-Pace) या कारची भारतात घोषणा केली. एसयूव्ही श्रेणीतील ही कार जॅग्‍वार लॅण्ड रोव्‍हरकडून भारतामध्‍ये सादर झालेली पहिली इलेक्ट्रिक (Electric) कार ठरली आहे.  या लक्झरियस आय-पेसची एक्स शोरूम किंमत 1 कोटी 5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. अगदी जॅग्वार या ब्रँडला साजेसी कारची रचना असून भारतात तिला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आय-पेस अत्‍याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानांचा वापर करून डिझाईन करण्‍यात आली आहे. आय पेसमध्ये 90 केडब्‍ल्‍यूएच (kwh) क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यावर सुमारे 470 किलोमीटर धावणार असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. शिवाय 294 केडब्‍ल्‍यू (kw) पॉवर आणि 696 एनएम टॉर्क देण्यात आल्याने ती 0-100 किलोमीटर प्रतितास वेग 4.8 सेकंदांमध्‍ये घेते. आय-पेसची किंमत 1.05 कोटी ठेवण्यात आली असली तरी त्यात कंपनीने 5 वर्षांचे सर्व्हिस, 5 वर्षांचा रोड-साइड असिस्‍टण्‍स, 7.4 केडब्‍ल्‍यू एसी वॉल माऊंटेड चार्जर आणि 8 वर्षे किंवा 1 लाख 60 हजार किलो मीटरपर्यंत बॅटरी वॉरण्‍टीचा समावेश आदी पॅकेज दिले आहेत. 

मर्सिडीज ईक्यूसीनंतर (Mercedez E-Q) जॅग्वार आय-पेस ही देशातील दुसरी लक्झरी इलेक्ट्रिक कार आहे. आय-पेसमध्‍ये सॉफ्टवेअर ओव्‍हर दि एअर (एसओटीए) कार्यक्षमता आहे. यामधून इन्‍फोटेन्‍मेंट, बॅटरी नियोजन आणि चार्जिंग अशा यंत्रणा दुरूनच अद्ययावत करता येतात. फूजी व्हाइट, कॅल्डेरा रेड, सॅन्टोरीनी ब्लॅक, युलाँग व्हाइट, इंडस सिल्व्हर, फिरेंज रेड, सेझियम ब्लू, बोर्स्को ग्रे, आयगर ग्रे, पोर्टोफिनो ब्ल्यू, फर्लेन्डो पर्ल ब्लॅक आणि अरुबा कुलसह आदी 12 रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

एकाचवेळी तीन पुरस्कार -

जग्‍वार आय-पेसने 80 हून अधिक जागतिक पुरस्‍कार पटकावले आहेत. या कारने 2019 चा 'वर्ल्ड कार ऑफ द इअर', 'वर्ल्ड कार डिझाईन ऑफ दी इअर' आणि 'वर्ल्ड ग्रीन कार' यासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. या व्यतिरिक्त, जॅग्वार आय-पेस ही पहिली कार आहे, जिने एकाच वेळी तिन्ही वर्ल्ड कार विजेतेपदे जिंकली आहेत.

स्पेसिफिकेशन-3-डी सराऊंड कॅमेरामुळे आसपासच्‍या भागाचे डिजिटल प्‍लान व्‍ह्यू. क्‍लिअरसाईट रिअर व्‍ह्यू मिरर व्हिजन सुविधा. 31.24 सेंटीमीटर (12.3 इंच) एचडी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर-वायरलेस डिवाईस चार्जिंग पॅड, सिग्‍नल बूस्टिंग, अॅपल कारप्‍ले आणि अँड्रॉईड ऑटो स्‍मार्टफोन पॅक, ब्ल्‍यूटूथ तंत्रज्ञान एकाच वेळी दोन फोनना कनेक्‍ट होऊ शकतो.-आय पेसची लांबी 4682 मिमी, रुंदी 2011 मिमी आणि उंची 1566 मिमी आहे. व्हीलबेस 2990 मिमी आणि ग्राउंड क्लिअरन्स 174 मिमी आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com