esakal | आता करा स्मार्ट फेस मास्कद्वारे भाषांतर, कसे ? ते वाचा .
sakal

बोलून बातमी शोधा

 japanese startup develops internet connected face mask

जपानी संशोधकांनी नवीन स्मार्ट फेस मास्क तयार केला असून ज्यामध्ये स्पीकर असणार आहे आणि तो स्पीकर आठ भाषांमध्ये भाषांतर करू शकते.

आता करा स्मार्ट फेस मास्कद्वारे भाषांतर, कसे ? ते वाचा .

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी जगभरात फेस मास्कची जाहिरात केली जात आहे. आता एक फेस मास्क विकसित केला गेला आहे. जो ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनला कनेक्ट करतो आणि कॉल आणि भाषांतर सारखी अत्यावश्यक कार्ये करतो.

मास्कद्वारे करा कॉल 
आम्ही तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात जगतो पण आतापर्यंत हे स्मार्ट मास्क नसलेले जग होते ! एक जपानी तंत्रज्ञान कंपनी डोनट रोबोटिक्सने आपल्या फोनला जोडणारा पहिला स्मार्ट फेस मास्क तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोविड १९ ला हरवण्यासाठी जगभरात लस शोधत आहे. तरीही एक सुरक्षित पर्याय म्हणून हा पांढरा प्लास्टिक सी-मास्क मानक फेस मास्कवर फिट आहे, आणि तो ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन आणि टॅब्लेटशी डायरेक्ट जोडला जातो जो संभाषणातील  मजकूर संदेशांमध्ये कॉपी करू शकतो, कॉल करू शकतो किंवा मास्क घालणा-याचा आवाज वाढवू शकतो. 

मास्क जो करतो भाषांतर
हा स्मार्ट मास्क ब्लूटूथद्वारे फोनला कनेक्ट होतो आणि  भाषांतर करतो. या सी-मास्कची किंमत सुमारे $ 40 आहे. आणि सप्टेंबरच्या सुरवातीला जपानी बाजारात हजारो मास्क उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. भाषांमध्ये इंग्रजी, चीनी, स्पॅनिश, फ्रेंच, कोरियन, थाई, व्हिएतनामी आणि इंडोनेशियनचा समावेश आहे. हा मास्क विविध भाषा वापरण्यासाठी शुल्कही आकारणार आहे. 

हेही वाचा : नासाने बनवला हा खास सुगंधी परफ्यूम , कोणता ? ते वाचा

डोनट रोबोटिक्समधील अभियंत्यांना ही मास्कची कल्पना आली जेव्हा कोरोनाव्हायरसच्या संकटात त्यांची कंपनी कठीण काळातून जात होती. त्यांची कंपनी वर्षानुवर्षे रोबोट बनवत आली आहे. सध्याच्या कोरोनाच्या महासंकटकाळात ही कंपनी स्मार्ट मास्क बनवत आहे.