Fortuner आणि Gloster ला टक्कर देणार ही नवी SUV; 19 मे रोजी किंमत होणार जाहीर | Jeep Meridian | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jeep Meridian
Fortuner आणि Gloster ला टक्कर देणार ही नवी SUV; 19 मे रोजी किंमत होणार जाहीर

Fortuner आणि Gloster ला टक्कर देणार ही नवी SUV; 19 मे रोजी किंमत होणार जाहीर

Jeep Meridian: जीप मेरिडियन एसयूव्हीची किंमत 19 मे रोजी जाहीर होणार आहे. जीप मेरिडियन थ्री-रो एसयूव्ही लिमिटेड आणि लिमिटेड ऑप्शन या दोन व्हेरियंटमध्ये येणार असून ती फक्त डिझेल एसयूव्ही असेल. जीपने नुकतेच नवीन मेरिडियन एसयूव्हीचे स्थानिक उत्पादन सुरू केले. या एसयूव्हीचे प्री-बुकिंग रु. 50,000 मध्ये केले जाऊ शकते. जीप मेरिडियन एसयूव्हीची किंमत टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टर रेंजच्या आसपास असण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Electric Scooters: भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 4 इलेक्ट्रीक स्कूटर्स

इंजिन आणि स्पीड-

मेरिडियन एसयूव्ही 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 2.0-लिटर टर्बो डिझेल इंजिनशी जोडलेली आहे. तिच्यात सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही SUV 198 kmph च्या टॉप स्पीड देऊ शकते आणि फक्त 10.8 सेकंदात 100 kmph वर जाऊ शकते. मेरिडियन एसयूव्ही फ्रंट व्हील आणि ऑल-व्हील ड्राइव्ह पर्यायांसह येते.

हेही वाचा: भारतात सर्वाधिक काळ विकल्या गेलेल्या कार.! जाणून घ्या

वैशिष्ट्ये-

जीप मेरिडियन ही थ्री-रो एसयूव्ही असून तिच्या सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग आहेत. यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, 10.1-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री पार्क असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय एलईडी हेडलॅम्प, डीआरएल, फॉग लॅम्प आणि सनरूफसह 7 उभ्या ग्रिलचा वापर करण्यात आला आहे. ही एसयूव्ही 18 इंच अलॉय व्हीलसह येते. जीप मेरिडियनचे बुकिंग मे महिन्यात सुरू होऊ शकते.

Web Title: Jeep Meridian Will Compete With Fortuner And Gloster Price Will Be Reveal On 19th May

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top